-
ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG vs CSK) यांच्यातील सामना हा मोठ्या धावसंख्येचा होता. पण, यात दोन्ही संघांकडून १-२ खेळाडूंनीच मोठी खेळी साकारली. चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ६० चेंडूंत १०८ धावा करत संघाला दोनशे पार नेलं. त्याला शिवम दुबेनं घणाघाती ६६ धावा करत चांगली साथ दिली. नेहमीप्रमाणे दुबेचे ७ षटकार होते. आणि त्यामुळेच शेवटच्या षटकांत दोनशेचा टप्पा गाठणं चेन्नईला शक्य झालं. चेन्नईच्या खेळपट्टीवर एरवी हे आव्हान खूपच जास्त.
आणि लखनौची सुरुवात चेन्नईच्या खेळपट्टीला साजेशा लौकिकानेच झाली. क्विंटन डी कॉक (०) आणि के एल राहुल (१६) हे दोघे सलामीवीर ३३ धावांत तंबूत परतले. त्यानंतर देवदत्त पल्लिकड़ही १३ धावा करून परतला. पण, तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या मार्कस स्टॉईनिसचा (Marcus Stoinis) इरादा वेगळा होता. शेवटच्या १० षटकांत त्याने खेळाचा नूर असा काही पालटला की, शेवटी लखनौने २१० ही धावसंख्या सहजच पार केली असं वाटावं. खरंतर पहिल्या दहा षटकांत लखनौच्या जेमतेम ८० धावा झाल्या होत्या. म्हणूनच स्टॉईनिसच्या ६३ चेंडूंत १२४ धावा या दोन्ही संघातील फरक ठरल्या. (IPL 2024)
(हेही वाचा – Navneet Rana: “राहुल गांधीची सभा अमरावतीत होतेय, त्याचा मला अभिमान वाटतो”, असं का म्हणाल्या नवनीत राणा?)
Marcus Stoinis bags the Player of the Match Award for his Terrific TON in a match-winning cause 🏆
With that, #LSG moves to the 4th position in the Points Table 👏
Scorecard ▶️ https://t.co/MWcsF5FGoc#TATAIPL | #CSKvLSG | @MStoinis pic.twitter.com/lcMpOG9V9T
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
स्टॉइनिसने ६३ चेंडूंत १२४ धावा करताना ६ षटकार आणि १३ चौकार लगावले. त्याचा स्ट्राईकरेट होता १९६ धावांचा. ऑस्ट्रेलियाकडून स्टॉईनिसला (Marcus Stoinis) मध्यवर्ती करारही मिळालेला नाही. पण, आयपीएलमध्ये (IPL 2024) मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं आहे. निकोलस पुरनची साथ मिळाल्यावर त्याने सामन्याचं चित्र एकहाती पालटून दिलं. त्यापूर्वी चेन्नईसाठी रहाणे पहिल्याच षटकात बाद झाल्यावर ऋतुराज गायकवाडने किल्ला लढवला. दुसऱ्या बाजूने डेरिल मिचेल (११) आणि रवींद्र जाडेजा (१६) झटपट बाद झाले. पण, शिवम दुबेची साथ मिळाल्यावर चेन्नईची धावगतीही वाढली. ऋतुराजने ६० चेंडूंत १०८ धावा केल्या त्या ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने. तर शिवम दुबेनं ४१ चेंडूंत ६६ धावा केल्या. दोघांनी चौथ्या गड्यासाठी १०४ धावांची भागिदारीही रचली.
लखनौ सुपरजायंट्स संघासाठी हा ८ सामन्यांतील पाचवा विजय होता. आणि अशासाठी महत्त्वाचा कारण, १० गुण मिळवून संघ आता गुणतालिकेत पहिल्या चारांत आला आहे. तर चेन्नई चौथ्या पराभवानंतर पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community