- ऋजुता लुकतुके
कधी कधी पराभवाचं दु:ख कमी असतं. मानहानीचं जास्त दु:ख होतं. मुंबई इंडियन्स संघाचं या हंगामात तसं झालंय. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध संघाला पराभव पत्करावा लागला. मागच्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा संघ गुण तालिकेत शेवटच्या क्रमांकावर राहिला. कर्णधार हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून मुंबईकडे आला आणि तो बदलही संघासाठी अवघड गेला. नियमित कर्णधार रोहित शर्माला खेळाडू आणि पाठिराख्यांचाही पाठिंबा होता. तो हंगामात नंतरही दिसून आला. हार्दिकला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. (IPL 2024 LSG vs MI)
हंगामातील शेवटच्या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या अर्थातच वैतागलेला होता. ‘आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळलो नाही. आणि त्याचाच फटका हंगामात आम्हाला बसला,’ अशी त्याची पहिली प्रतिक्रिया होती. नेमकं काय चुकलं हे मात्र तो लगेचच बोलला नाही. काही वेळ गेल्यावर त्याचा विचार करू असं त्याचं म्हणणं होतं. पण, संघाचे प्रयत्न कमी पडले असं त्याला नक्की वाटतं. (IPL 2024 LSG vs MI)
‘हे व्यावसायिक क्रिकेट आहे. इथं तुमचं सगळ्यात भक्कम पाऊल पुढे पडावं लागतं आणि तेच नेमकं झालं नाही. संघ म्हणून चांगली कामगिरी करण्यात आम्ही कमी पडलो. आम्ही हंगामाकडे गंभीरपणे पाहिलं नाही,’ असं हार्दिक म्हणाला. वैयक्तिक कामगिरीवर तो फारसं बोलला नाही. (IPL 2024 LSG vs MI)
For his whirlwind knock, Nicholas Pooran bags the Player of the Match Award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/VuUaiv4G0l #TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/X3pd11zAzs
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2024
(हेही वाचा – Gautam Gambhir : गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडून विचारणा?)
दुसरीकडे लखनौचा विजय झाला असला तरी कर्णधार के एल राहुलही फारसा खुश नव्हता. निकोलस पुरनची कामगिरी सोडली, तर संघासाठी सातत्यपूर्ण असं काहीच नव्हतं, असं तो म्हणाला. ‘हंगामाची सुरुवात आमच्यासाठी खरंतर आश्वासक झाली होती. सगळं काही ठिक आहे, असं मला तेव्हा वाटायचं. पण, त्यानंतर संघात एक-दोन दुखापती उद्भवल्या आणि सगळं बिघडत गेलं,’ असं राहुल म्हणाला. (IPL 2024 LSG vs MI)
राहुलला अर्थातच मयांक यादवच्या दुखापतीविषयी बोलायचं होतं आणि सांघिक खेळ झाला नाही हे ही राहुलने मान्य केलं. यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. चौथ्या संघाचा फैसला बंगळुरू आणि चेन्नई दरम्यानच्या सामन्याने होणार आहे. (IPL 2024 LSG vs MI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community