IPL 2024, M. S. Dhoni Retirement : चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीच्या निवृत्तीवर नेमकी काय चर्चा झाली?

IPL 2024, M. S. Dhoni Retirement : बंगळुरू विरुद्धचा सामना संपल्या संपल्या धोनी चर्चेला बगल देत रांचीला निघून गेला 

96
IPL 2024, M. S. Dhoni Retirement : चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीच्या निवृत्तीवर नेमकी काय चर्चा झाली?
IPL 2024, M. S. Dhoni Retirement : चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीच्या निवृत्तीवर नेमकी काय चर्चा झाली?
  • ऋजुता लुकतुके

मागच्या शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाबरोबर झालेला सामना चेन्नई सुपर किंग्जने (CSK) २४ धावांनी गमावला. आणि त्याचबरोबर संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या पराभवामुळे त्यांचा दिग्गज खेळाडू महेंद्र सिंग धोनी नक्कीच काहीसा खट्टू होता. पण, सामना संपल्या संपल्या तो बंगळुरूत फार वेळ न ताटकळता त्याच रात्री आपली पत्नी आणि मुलगी झिवासह रांचीला निघून गेला. तो सामन्यानंतर फारसा तिथे थांबलाच नाही. (IPL 2024, M. S. Dhoni Retirement)

(हेही वाचा- Essel World Mumbai : एस्सेल वर्ल्डमध्ये गेल्यावर कोणत्या राईड्सवर बसाल? जाणून घ्या धमाकेदार राईड्सबद्दल)

त्याचं हे वागणं आणि एकूणच चेन्नईसाठी हंगाम संपल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीची चर्चा त्याच्या परोक्ष सुरू झाली आहे. चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने धोनीच्या निवृत्तीचा निर्णय पूर्णपणे त्याच्यावर सोपवला आहे. ही गोष्ट अनेकदा धोनीनेही बोलून दाखवली आहे. या हंगामात त्याने जाणीवपूर्वक नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे (Rituraj Gaikwad) सुपूर्त केलं. हळू हळू जबाबदाऱ्या दुसऱ्यावर सोपवण्याचाच हा भाग होता. पण, मुख्य प्रश्न म्हणजे धोनीच्या निवृत्तीचं काय? चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये त्यावर काय चर्चा झाली? (IPL 2024, M. S. Dhoni Retirement)

चेन्नई फ्रँचाईजीमधील एक अधिकारी विश्वनाथ यांनी याविषयी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ‘तो असताना आणि तो नसतानाही ड्रेसिंग रुम किंवा संघाच्या बैठकीत यावर कधीच चर्चा होत नाही. तशीच ती बंगळुरूमध्येही झाली नाही. तो हा निर्णय घेईल तेव्हा तो आम्हाला कळवेल. तोपर्यंत त्यावर चर्चा नाही,’ असं विश्वनाथ इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले. (IPL 2024, M. S. Dhoni Retirement)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident: पुण्यात बुलडोझर पॅटर्न! अवैध पबवर पालिकेची धडक कारवाई)

यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ १४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिला. खुद्द धोनीने १४ सामन्यांत १६१ धावा केल्या. पण, तो तळाला येऊन फलंदाजी करत होता आणि त्याचा स्ट्राईकरेट तब्बल २२० धावांचा होता. या १४ सामन्यांत त्याने १४ षटकार आणि १३ चौकार मारले आहेत. अलीकडेच दुबईतील एका युट्यूब चॅनलशी बोलताना धोनीने आपलं वय आणि क्रिकेटचा ताण यावर भाष्य केलं होतं. ‘मी आता वर्षभर क्रिकेट खेळत नसलो, तरी त्यामुळे मी आयपीएलसाठी ताजातवाना असतो असं नाही. वय बोलतंच,’ असं तो म्हणाला होता. तो ४२ वर्षांचा आहे. त्यामुळे हा हंगाम संपला असला तरी पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीविषयी कुतुहल सगळ्यांना असणारच, जसं ते गेल्यावर्षीही होतं. (IPL 2024, M. S. Dhoni Retirement)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.