IPL 2024, M S Dhoni : बंगळुरू विरुद्धचा सामना हरल्यानंतर धोनी रात्रीच रांचीला का परतला?

IPL 2024, M S Dhoni : सामन्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमातही धोनी गायब होता 

210
IPL 2024, M S Dhoni : बंगळुरू विरुद्धचा सामना हरल्यानंतर धोनी रात्रीच रांचीला का परतला?
IPL 2024, M S Dhoni : बंगळुरू विरुद्धचा सामना हरल्यानंतर धोनी रात्रीच रांचीला का परतला?
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार खेळाडू महेंद्र सिंग धोनी (IPL 2024, M S Dhoni) शनिवारी बंगळुरू विरुद्धच्या पराभवानंतर त्याच रात्री तातडीने आपलं गाव रांचीला परतला. शेवटच्या साखळी सामन्यातील पराभवानंतर संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. खरंतर सामना संपल्या संपल्याच धोनीने मैदान सोडलं. त्यामुळे धोणी कुठे गायब झाला याची चर्चा स्टेडिअमवर आणि खासकरून मीडियात रंगली होती. पण, रात्री उशिरा रांची विमानतळावर धोणी बाहेर येऊन आपल्या गाडीत बसतानाचा व्हीडिओ आता समोर आला आहे.  (IPL 2024, M S Dhoni)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी)

धोनीने बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात तळाला येऊन फटकेबाजी करत १३ चेंडूंत २५ धावा केल्या. यात त्याने २ चौकार आणि एक उत्तुंग षटकार खेचला. त्याने मारलेला षटकार १०३ मीटर लांब गेला. (IPL 2024, M S Dhoni)

४३ वर्षीय धोनीविषयी या हंगामात आणखी एक महत्त्वाची चर्चा रंगली आहे. चेन्नईला ५ वेळा आयपीएल विजेतेपद पटकावून देणाऱ्या धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असावा अशी चर्चा सुरुवातीपासूनच सुरू होती. असं असेल तर कदाचित शनिवारचा सामना त्याचा शेवटचा सामना ठरावा. त्यातच तो तातडीने मैदान सोडून गेल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. (IPL 2024, M S Dhoni)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: …त्यांना लागली पराभवाची चाहूल, राजन विचारेंच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचा जोरदार पलटवार)

चेन्नईला शनिवारच्या सामन्यात शेवटच्या षटकांत विजयासाठी १७ धावा हव्या होत्या. धोनीने यश दयालला एक जोरदार षटकार खेचला. पण, नंतरच्या चेंडूवर दयालने धोणीला बाद केलं. त्यानंतर दयालने काही चेंडू निर्धाव टाकत बंगळुरूला विजयही मिळवून दिला. (IPL 2024, M S Dhoni)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.