- ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपरकिंग्जचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने (IPL 2024, Mahendra Singh Dhoni) रविवारी आणखी एक आयपीएल विक्रम आपल्या नावावर केला आहे. स्पर्धेच्या इतिहासात १५० झेल टिपणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यष्टीरक्षणात रिफ्लेक्सेस आणि चपळता महत्त्वाची. धोनीने या हंगामातही काही अवघड झेल सूर मारून टिपले आहेत. चेन्नईच्या सिमरजीत सिंगने लागोपाठच्या दोन चेंडूंवर प्रभसिमरन (Prabhasimran) आणि जितेश शर्मा (Jitesh Sharma) या दोघांना बाद केलं. यातील जितेश शर्माचा झेल धोनीने यष्टीमागे अचूक पकडला. जितेश अर्थाच गोल्डन डकवर बाद झाला. धोनीचा हा १५० वा झेल ठरला. (IPL 2024, Mahendra Singh Dhoni)
MS Dhoni becomes the first player in IPL history to complete 150 catches. 🐐 pic.twitter.com/Kr8TYcLJ5A
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2024
धोनीच्या पाठोपाठ बंगळुरुचा दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) १४४ झेलांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरूचाच एबी डिव्हिलिअर्स ११८ झेलांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर ११३ तर सुरेश रैनाच्या (Suresh Raina) नावावर १०९ झेल आहेत. (IPL 2024, Mahendra Singh Dhoni)
(हेही वाचा- T-20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी, धोक्यांबाबत सतर्क राहण्याचा इशारा)
- आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल
महेंद्रसिंग धोनी – १५०
दिनेश कार्तिक – १४४
एबी डिव्हिलिअर्स – ११८
विराट कोहली – ११३
सुरेश रैना – १०८
(हेही वाचा- Dausa: मध्य प्रदेशातील दौसा येथील मुख्य रेल्वे स्थानके कोणती ? जाणून घ्या)
या पाच खेळाडूंपैकी सुरेश रैना (Suresh Raina) आणि एबी डिव्हिलिअर्स (AB de Villiers) यांनी आता आयपीएलमधून निवृत्ती पत्करली आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. इथं एक नकोसा विक्रमही त्याच्या नावावर लागला. तो पहिल्यांदाच गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. हर्षल पटेलने त्याचा त्रिफळा उडवला. (IPL 2024, Mahendra Singh Dhoni)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community