- ऋजुता लुकतुके
चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स संघादरम्यानच्या सामन्यात आधी ऋतुराज गायकवाड आणि त्यानंतर मार्कस स्टॉईनिस अशी दोन वादळं अनुभवायला मिळाली. पैकी स्टॉईनिस हे वादळ शमण्याचं लक्षणच नव्हतं. त्याच्या ६३ चेंडूंत १२४ धावांच्या खेळीमुळेच लखनौने २१० या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. आणि या खेळीमुळे २०११ च्या पॉल वल्थाटीच्या चेन्नई विरुद्धच्याच १२० धावांच्या खेळीची आठवण निघाली. कारण, धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांची खेळी करत स्टॉईनिसने वल्थाटीचा विक्रम मोडीत काढला. वल्थाटीने २०११ मध्ये चेन्नई विरुद्ध १२० धावा केल्या होत्या. (IPL 2024 Marcus Stoinis)
स्टॉईनिसने ६३ चेंडूंत १२४ धावा करताना ६ षटकार आणि १२ चौकार ठोकले. महत्त्वाचं म्हणजे २११ धावांचं लक्ष्य असताना पहिल्या दहा षटकांत लखनौने ३ गडी गमावले होते. आणि फलकावर धावा होत्या ८२. पण, त्यानंतर स्टॉईनिसने खेळाचा नूरच पालटला. (IPL 2024 Marcus Stoinis)
That match-winning ROAR 🔥🔥
Highest successful IPL run-chase of all time in Chennai 🙌
Scorecard ▶️ https://t.co/MWcsF5FGoc#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/YS1Xvv3iW1
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
स्टॉईनिसने आधी शतक पूर्ण केलं ते ५६ चेंडूंत. ते करताना निकोलस पुरनसोबत ७० धावांची वेगवान भागिदारीही रचली. धावांचा पाठलाग करताना आयपीएलमध्ये साकारलेल्या मोठ्या वैयक्तिक खेळींवर एक नजर टाकूया, (IPL 2024 Marcus Stoinis)
१२४ मार्कस स्टॉईनिस – लखनौ सुपरजायंट्स वि. चेन्नई सुपरकिंग्ज – चेन्नई(२०२४)
१२० पॉल वल्थाटी – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज – मोहाली (२०११)
११९ विरेंद्र सेहवाग – दिल्ली कॅपिटल्स वि. डेक्कन चार्जर्स – हैद्राबाद (२०११)
११९ संजू सॅमसन – राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्ज इलेव्हन – मुंबई (२०२१)
११७ शेन वॉटसन – राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैद्राबाद – मुंबई (२०१८)
(हेही वाचा – IPL 2024, LSG vs CSK : मार्क स्टॉईनिसच्या धडाक्यापुढे चेन्नईचा ६ गडी राखून पराभव)
विशेष म्हणजे लखनौ संघाने या आयपीएलमध्ये ५ दिवसांत चेन्नईवर सलग दुसरा विजय मिळवला आहे. स्टॉईनिसने पुरनबरोबर चौथ्या गड्यासाठी केलेली ३४ चेंडूंत ७० धावांची भागिदारी लखनौला विजय मिळवून देण्यात मोलाची ठरली. (IPL 2024 Marcus Stoinis)
Have a look at those emotions 🥳
The Lucknow Super Giants make it 2/2 this season against #CSK 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/MWcsF5FGoc#TATAIPL | #CSKvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/khDHwXXJoF
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
निकोलस पुरन ३४ धावा करून बाद झाल्यावर स्टॉईनिसने दीपक हुडाबरोबर १९ चेंडूंत ५५ धावांची भागिदारी केली. आणि तिथेच सामना लखनौच्या हातात आला. स्टॉईनिसच्या या खेळीमुळे लखनौचा विजय तर साकार झालाच. शिवाय आयपीएलच्या इतिहासातील एक अविस्मरणीय खेळी म्हणूनही ती चाहत्यांच्या लक्षात राहील. (IPL 2024 Marcus Stoinis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community