- ऋजुता लुकतुके
२१ वर्षीय मयंक यादव (Mayank Yadav) या आयपीएलची लखनौ एक्सप्रेस ठरला आहे. लखनौ सुपरजायंट्स संघातील हा खेळाडू फक्त ताशी १५५ किमीच्या वेगाने चेंडू टाकत नाहीए तर ते अचूक यॉर्कर टप्प्यावर टाकण्यातही तो यशस्वी होतोय. शेवटच्या बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात त्याने फलंदाजांना आपला वेग आणि शैली यांच्या दोरावर जेरीला आणलं. (IPL 2024 Mayank Yadav)
बंगळुरूचं चिन्नास्वामी मैदान आकाराने लहान असल्याने षटकारांसाठीच ओळखलं जातं. पण, मंगळवारी बंगळुरूच्या फलंदाजांना मयंकने (Mayank Yadav) जखडून ठेवलं. आणि ३ षटकांत १४ धावा देत आघाडीचे तीन फलंदाज बाद केले. या कामगिरीनंतर आधीच चर्चेत असलेल्या मयंकचं नाव आता आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी घेतलं जातंय. आतापर्यंत लखनौ सुपरजायंट्स संघासाठी तो उपयुक्त कामगिरी करतोय. पण, इतक्यात भारतीय संघात त्याला स्थान मिळू शकेल का? ते त्याच्यासाठी योग्य असेल का? (IPL 2024 Mayank Yadav)
ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी यांनी आयपीएल आणि टी-२० विश्वचषकातील फरक अधोरेखित केला. ‘तो चांगलीच गोलंदाजी करतोय. आणि त्यामुळे राष्ट्रीय संघासाठी त्याच्या नावाची चर्चा होतेय. पण, संघात स्थान मिळण्यापूर्वी मयंक (Mayank Yadav) पॉपरप्लेमध्ये कशी गोलंदाजी करू शकेल, तो शेवटच्या षटकांमध्येही गोलंदाजीसाठी योग्य आहे का? अशा आणखी काही निकषांवर त्याची कामगिरी पडताळून पाहावी लागेल. मगच राष्ट्रीय संघात समावेशावर निर्णय होऊ शकेल,’ असं मत मूडी यांनी मांडलं. (IPL 2024 Mayank Yadav)
(हेही वाचा – Attack By Muslim Mob: नाशिकमध्ये महंत अनिकेतशास्त्री महाराजांवर मुस्लिम समाजाकडून हल्ला)
MAYANK YADAV – THE FAST BOWLING BEAST. 🤯🔥pic.twitter.com/79okntJ8ix
— Johns. (@CricCrazyJohns) April 2, 2024
मयंकने फॉर्म टिकवायला हवा – मिचेल
मिचेल मॅकक्लेनेगन यांनी टी-२० विश्वचषकासाठी त्याची चर्चा तर होणारच असा दुजोरा दिला. ‘आयपीएल संपल्या संपल्या विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आणि मयंकचा फॉर्म असाच राहिला. तर फक्त फॉर्मच्या निकषावरही त्याच्या नावाची चर्चा व्हायला हवी. आणि गोलंदाजीची लय सापडलेले खेळाडू संघात हवेच. अर्थात, अजून खूप मोठी स्पर्धा बाकी आहे. मयंकने (Mayank Yadav) फॉर्म टिकवायला हवा,’ असं मिचेल यांनी बोलून दाखवलं. (IPL 2024 Mayank Yadav)
मयंकने (Mayank Yadav) लखनौला आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून दिले आहेत. आणि पदार्पणाच्या दोन्ही सामन्यांत सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा विक्रमही केला आहे. बंगळुरू विरुद्ध ताशी १५६.७ किमी वेगाने टाकलेला त्याचा चेंडू या हंगामातील सगळ्यात जलद चेंडू ठरला आहे. पंजाब विरुद्धही त्याने २७ धावांत ४ बळी मिळवले होते. वेगाबरोबरच चेंडूची दिशा आणि टप्पा यावर चांगलं नियंत्रण असल्यामुळे मयंकची सगळीकडे चर्चा होत आहे. (IPL 2024 Mayank Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community