-
ऋजुता लुकतुके
१७३ धावांचा पाठलाग करताना मुंबईची अवस्था ३ बाद ३१ अशी होती. पण, तेव्हाच वानखेडे मैदानावर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नावाचं वादळ घोंघावायला लागलं. आणि तिथून सामना फिरला. ६ टोलेजंग षटकार आणि १२ चौकार ठोकून त्याने ५१ चेंडूंत १०२ धावा केल्या. आणि मुंबईला एकहाती हा सामना जिंकून दिला. इतकंच नाही तर सनरायझर्स हैद्राबादच्या बाद फेरी गाठण्याच्या प्रयत्नांनाही एक जोरदार दणका दिला. त्यामुळे चेन्नई आणि दिल्ली हे इतर दोन संघही या निकालामुळे खुश झाले. (IPL 2024)
टी-२०च्या मैदानावर सूर्यकुमारचा शो सुरू होतो तेव्हा मैदानात फक्त दोनच आवाज येतात. एक सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) खणखणीत फटक्यांचे. आणि मग लोकांच्या आरडाओरड्याचे. तसंच सोमवारी रात्री वानखेडे मैदानावर झालं. सूर्याची बॅट तळपली. आणि पुढे मुंबईचा विजय, मैदानावार जल्लोषाचं वातावरण या गोष्टी आपोआप घडत गेल्या.
(हेही वाचा – Indian Coast Guard: केरळच्या किनाऱ्याजवळून ६ भारतीयांसह इराणची बोट ताब्यात)
A 𝐒𝐊𝐘 full of shots 😌#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvSRH pic.twitter.com/tF60g7s2gB
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2024
(हेही वाचा – Sachin Tendulkar : शेजाऱ्यांनी सचिन तेंडुलकरला केली बांधकामाचा आवाज कमी करण्याची विनंती)
सामन्यानंतर बोलताना मुंबईचा कर्णधार हार्दिकनेही सुर्यकुमारच्या खेळीचा सामन्यावरील प्रभाव बोलून दाखवला. ‘सूर्यकुमार खेळतो तेव्हा त्याचे फटके आणि त्यातील सातत्य हे अविश्वसनीय असतं. तो समोरच्या संघाला तोडतो. त्यामुळे त्याच्या फलंदाजीतील साथीदारालाही अचानक सोपे चेंडू मिळायला सुरुवात होते. सूर्यकुमारचा प्रभावच असा दांडगा आहे. तो संघात असणं हे आमचं भाग्यच आहे,’ या शब्दांत हार्दिकने सूर्यकुमारचं कौतुक केलं. (IPL 2024)
तर पियुष चावला आणि आपल्या स्वत:च्या गोलंदाजीवरही त्याने समाधान व्यक्त केलं. ‘आम्ही सगळ्यांनी मिळून १५-२० धावा जास्त दिल्या. पण, शेवटी फलंदाजांनी कसर भरून काढल्यामुळे फारसं नुकसान झालं नाही. मला अशी गोलंदाजी करायला आवडते. खेळपट्टीवर चांगल्या जागांमध्ये टप्पा पडला तर मजा येते. पियुषही भन्नाट फॉर्ममध्ये होता,’ असं हार्दिकने बोलून दाखवलं. (IPL 2024)
मुंबई इंडियन्सचा बाद फेरीचा मार्ग अजूनही कठीणच आहे. पण, आता त्याचा विचार करत नसल्याचं हार्दिक आणि सूर्यकुमारनेही सांगितलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community