IPL 2024 Mi vs GT : चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईचा गुजरातकडून ६ धावांनी पराभव

IPL 2024 Mi vs GT : ४ बाद १२९ नंतर मुंबईची पडझड झाली. 

242
IPL 2024 Mi vs GT : चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईचा गुजरातकडून ६ धावांनी पराभव
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सना टी-२० क्रिकेट किती निर्दय आहे याचं वास्तव अनुभवायला मिळालं. गुजरातने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी दिली असताना जसप्रीत बुमरा (१४/3) आणि गेराल्ड कोत्झीए (२७/२) यांनी गुजरात संघाला १६८ धावांवर रोखलं होतं. त्यानंतर इशान किशनचा बळी शून्यावर गेला असला तरी त्यानंतरतच्या रोहित शर्मा (४३), नमन धीर (२०) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (४६) यांनी चांगली फलंदाजी करत मुंबईला विजयाच्या जवळही आणलं होतं. (IPL 2024 Mi vs GT)

पण, विजयासाठी फक्त ४० धावा हव्या असताना आणि हातात ६ गडी असताना हे मुंबईला शेवटी ६ धावा कमीच पडल्या. याचं कारण होतं मधल्या फळीची झालेली पडझड. आणि फलंदाज एकावेळी जोडीने बाद झाल्यामुळे संघावर वाढलेलं दडपण, टीम डेव्ही (११), हार्दिक पांड्या (११), कोत्झीए (१) आणि पियुष चावला मोठा फटका खेळण्याच्या नादात झटपट बाद झाले. आणि सुरुवातीला अवाक्यात भासणारा विजय मुंबईसाठी शेवटच्या ४ षटकांत हातातून गेला. (IPL 2024 Mi vs GT)

(हेही वाचा – MP Oldest Temple : मध्यप्रदेशात उत्खननात सापडला देशातील सर्वांत प्राचीन वारसा; पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठे यश)

गुजरातने हिंमत न हरता त्वेषाने खेळत सामना खेचून आणला

त्यापूर्वी गुजरातच्या संघाला दीडशेचा टप्पा गाठण्यासाठीही संघर्ष करावा लागला. शुभमन गिल (३१) आणि साई सुदर्शन (४३) यांच्यामुळे संघाने इथवर मजल मारली. आणि शेवटच्या षटकांत राहुल टेवाटियाने थोडीफार फटकेबाजी केली. पण, जसप्रीत बुमराने ४ षटकांत फक्त १२ धावा देत ३ बळी टिपले. आणि गुजरातच्या डावाला खिंडार पाडलं. त्याच्या खालोखाल गेराल्ड कोत्झीएनं २७ धावांत २ बळी घेतले. (IPL 2024 Mi vs GT)

याउलट गुजरातने हिंमत न हरता त्वेषाने खेळत सामना खेचून आणला. अझमतुल्ला ओमारझाई, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेन्सर या सर्व गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या चेंडूंवर मुंबईच्या फलंदाजांना चकवलं. आणि मुंबई सामन्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवणार असं वाटत असतानाच फलंदाजाला बाद करणं त्यांना शक्य झालं. या विजयासह गुजरात संघाने घरच्या मैदानावर मुंबई विरुद्ध १०० टक्के विजयाची टक्केवारी कायम राखली आहे. (IPL 2024 Mi vs GT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.