ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वात काय जादू आहे कोण जाणे, त्याचा संघ अविश्वसनीय कामगिरी करत सामना जिंकून दाखवू शकतो. एकदिवसीय विश्वचषक त्यानेच ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. आणि आता सनरायझर्स हैद्राबाद संघालाही त्याने विजयाचा मंत्र दिला आहे. मुंबईविरुद्ध कमिन्सच्या संघाने पहिली फलंदाजी करत चक्क ३ बाद २७७ धावा केल्या. आणि त्यानंतर मुंबईने प्रयत्न करूनही त्यांना ५ बाद २४६ धावांवर रोखलं. आणि हैद्राबादने सामन्यात ३१ धावांनी विजय नोंदवला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. (IPL 2024)
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाणेफेक जिंकून हैद्राबादला पहिली फलंदाजी दिली. कारण, मैदान छोटं आणि खेळपट्टीकडून फलंदाजांना मदत करणारं होतं. पण, खेळपट्टीचा जो फायदा हैद्राबादने उचलला, तो मुंबईच्या मधल्या फळीला उचलता आला नाही. हैद्राबादकडून ट्रेव्हिस हेडने आधी २४ चेंडूंत ६२ धावा करत पायाभरणी केली. त्यावर अभिषेक शर्माने २३ चेंडूंत ६३ आणि हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) तर ३४ चेंडूंत ८० धावा करत कळस चढवला. परिणामी, सनरायझर्स हैद्राबादने आयपीएलमध्ये सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम नावावर केला. या धावसंख्येला उत्तर देताना मुंबईनेही निकराचा प्रयत्न केला. आणि २४६ पर्यंत मजलही मारली. पण, तिलक वर्माच्या ६४ धावा सोडल्या तर फलंदाज मोठी खेळी रचू शकले नाहीत. मधली फळी तर धावांचा वेग राखण्यातही अपयशी ठरली. आणि तिथेच मुंबईचा पराभव झाला. (IPL 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कोणाला मिळणार संधी ?)
The fight, the intent – only proud of this team. #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #SRHvMI pic.twitter.com/tUtiEJoivv
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2024
हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर जमलेल्या ३५,००० प्रेक्षकांना ५०० पेक्षा जास्त धावांची मेजवानी मात्र पहायला मिळाली. आयपीएलच्या इतिहासातील हा विक्रम आहे. एकाच सामन्यात ५०० धावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर हैद्राबादने एका डावांत आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्याही रचली आहे. (IPL 2024)
WHAT. A. MATCH! 🔥
Raining sixes and 500 runs scored for the first time ever in #TATAIPL 💥
Hyderabad is treated with an epic encounter 🧡💙👏
Scorecard ▶️ https://t.co/oi6mgyCP5s#SRHvMI pic.twitter.com/hwvWIDGsLh
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
इतकंच नाही तर डावातील आणि सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा विक्रमही या सामन्यात स्थापन झाला. हैद्राबाद संघाने वीस षटकांत १८ षटकार ठोकले. तर मुंबई इंडियन्सनी २० षटकार खेचले. मुंबईकडून खेळलेल्या सातही फलंदाजांनी किमान एक षटकार चढवला. हा ही एक विक्रमच आहे. एकूण सामन्यांत २८ षटकारांची आतषबाजी झाली. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community