IPL 2024, M. S. Dhoni : धोनी पुढील हंगामात खेळेल असा चेन्नई फ्रँचाईजीला विश्वास

IPL 2024, M. S. Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या मताचा आदर करतो, असंही म्हटलं आहे

122
IPL 2024, M. S. Dhoni : धोनी पुढील हंगामात खेळेल असा चेन्नई फ्रँचाईजीला विश्वास
IPL 2024, M. S. Dhoni : धोनी पुढील हंगामात खेळेल असा चेन्नई फ्रँचाईजीला विश्वास
  • ऋजुता लुकतुके

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) फ्रँचाईजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (Viswanathan) यांनी पुन्हा एकदा धोनीच्या (IPL 2024, M. S. Dhoni) निवृत्तीविषयी फ्रँचाईजीची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘स्वत:विषयीचे सर्व निर्णय आतापर्यंत धोनी स्वत: घेत आला आहे. आताही तो त्यानेच घ्यावा. आम्ही त्याच्या प्रत्येक निर्णयाचा आदरच करतो,’ असं विश्वनाथन यांनी म्हटलं आहे. आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संघ बाद फेरी गाठू शकला नाही. त्यानंतर धोनी सगळ्यांना चुकवून मध्यरात्रीच रांचीला निघून गेला. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीविषयीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. (IPL 2024, M. S. Dhoni)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: “…तर निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेन”, काँग्रेस मंत्र्याची उघड धमकी)

गेल्या आठवड्यात शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) चेन्नईचा २७ धावांनी पराभव झाला. तिथेच चेन्नईचं आव्हान संपलं. त्यानंतर संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर धोनीने आपली भूमिका मांडली आहे. ‘मला माहीत नाही. निवृत्तीच्या प्रश्नाचं उत्तर फक्त धोनीच देऊ शकेल. त्याच्याविषयीचे सगळे निर्णय त्याने स्वत: घेतले आहेत. आताही तो निर्णय घेईल. योग्य वेळी आपला निर्णय आम्हाला कळवेल, अशी आम्हाला आशा आहे,’ असं विश्वनाथन (Viswanathan) या मुलाखतीत म्हणताना दिसतात.  (IPL 2024, M. S. Dhoni)

पुढे विश्वनाथन असंही म्हणतात की, ‘आम्हाला तो आपला निर्णय सांगेल अशी आशा आहे. त्याचवेळी असंही वाटतं की, पुढील हंगामातही तो फ्रँचाईजीबरोबर असेल. चेन्नईचा चाहता वर्ग आणि आमची सगळ्यांची तशीच इच्छा आहे.’ धोनी व्यतिरिक्त चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्याविषयीही त्यांनी मुलाखतीत भाष्य केलं आहे. (IPL 2024, M. S. Dhoni)

(हेही वाचा- T20 World Cup 2024 : ‘भारतीय संघात संजू सॅमसन नाही तर रिषभ पंतला खेळवावं’ – युवराज सिंग)

‘स्टिफन भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून अर्ज करेल असं मला वाटत नाही. मी त्याला एकदा विचारलंही. पण, तो मजेत म्हणाला, मी करावा असं तुला वाटतंय का? इतकंच तो बोलला. त्यावरून माझा अंदाज आहे की, स्टिफन फ्लेमिंग अर्ज करणार नाही,’ असं विश्वनाथन म्हणाले. (IPL 2024, M. S. Dhoni)

या हंगामात चेन्नईने नेतृत्वात एक महत्त्वाचा बदल केला. धोनीने कप्तानी सोडली आणि ती जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली. पण, ऋतुराजने ती योग्य रितीने निभावल्याचं विश्वनाथन (Viswanathan) यांचं म्हणणं आहे. (IPL 2024, M. S. Dhoni)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.