IPL 2024 Mumbai Indians : यंदाच्या आयपीएल नंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?

IPL 2024, Mumbai Indians : आयपीएल नंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याची बातमी सध्या सगळीकडे पसरली आहे. 

224
IPL 2024 Mumbai Indians : यंदाच्या आयपीएल नंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्सबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मुंबई इंडियन्सला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) कप्तापदावरुन बाजूला करुन हार्दिक पांड्यावर ती जबाबदारी देण्यात आली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबईला त्यांच्या लौकिकाप्रमाणं कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पांड्याबद्दल प्रेक्षकांकडून करण्यात असलेली शेरेबाजी चर्चेत असताना आज नवी चर्चा सुरु झाली आहे. रोहित शर्मा हे आयपीएल संपल्यानंतर मुंबई इंडियन्सची साथ सोडेल अशा चर्चा सुरु होत्या. या चर्चा सुरु असताना मुंबई इंडियन्सचे आणखी दोन खेळाडू या आयपीएलनंतर संघाची साथ सोडतील अशा चर्चा सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे या केवळ चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (IPL 2024 Mumbai Indians)

रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या भारतीय संघाचं नेतृत्त्व करत आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबत २०११ पासून खेळतोय. मुंबईनं २०११ मध्ये रोहितला ९.२ कोटी खर्च करुन संघात घेतलं होतं. रोहित त्यापूर्वी डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. रोहित शर्मानं आयपीएलमध्ये २०१ सामन्यांत ५,११० धावा केल्या आहेत. रोहितनं मुंबईला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. मात्र, मुंबईच्या मॅनेजमेंटनं भविष्याचा विचार करुन यंदा टीमचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे दिल्याचं सांगितलं गेलं. न्यूज २४ च्या रिपोर्टमध्ये रोहित शर्मा हार्दिकच्या नेतृत्त्वात खूश नसल्याचं सांगण्यात आलं आहे. (IPL 2024 Mumbai Indians)

(हेही वाचा – Mamata Banerjee : लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘ईदी’चा शिधा; लुंगी, नमाजी टोपी, शेवया आणि सुका मेवा)

मुंबईच्या टीममध्ये सूर्यकुमार यादव सहभागी होण्याची शक्यता

रोहित शर्मा (Rohit Sharma) यंदाचं आयपीएल संपल्यानंतर मुंबईची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांमध्ये जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादवच्या नावाची भर पडली आहे. रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. तर, सूर्यकुमार यादव ९ वर्षांपासून आणि जसप्रीत बुमरा १२ वर्षांपासून मुंबईकडून खेळत आहे. (IPL 2024 Mumbai Indians)

मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारलेला आहे. आता मुंबई इंडियन्सची पुढील मॅच रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं एका मॅचमध्ये विजय मिळवलाय तर त्यांना तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आगामी लढतीत मुंबईच्या टीममध्ये सूर्यकुमार यादव सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आगामी लढतीत मुंबईची फलंदाजी भक्कम होईल. हार्दिकच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळणार याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय. (IPL 2024 Mumbai Indians)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.