- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians) या आयपीएलमध्ये आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. अशावेळी खेळाडूंचं धैर्य कायम रहावं आणि संघातील शिस्तही कायम रहावी यासाठी संघ प्रशासनाने आपले सुपरमॅन जंपसूट परत आणले आहेत. मुंबई फ्रँचाईजीचा निळा रंग आणि त्यावर पिवळ्या आकारात सुपरमॅनचा त्रिकोण असलेले हे जंपसूट खेळाडूंनी प्रवास आणि संघाच्या कार्यक्रमांना घालायचे आहेत. अर्थात, सगळ्यांनी नाही, तर ज्यांना शिक्षा होईल अशाच खेळाडूंनी. या जंपसूटना ‘पनिशमेंट जंपसूट’ असंच म्हटलं जातं. (IPL 2024 Mumbai Indians)
जे खेळाडू सराव, संघाची बस आणि इतर सांघिक कार्यक्रमांना उशिरा येतील, त्यांनी हे जंपसूट शिक्षा म्हणून घालायचे आहेत. यापूर्वीही मुंबई फ्रँचाईजीने असा प्रयोग खेळाडूंबरोबर केला आहे. आताही जंपसूट घातलेल्या खेळाडूंचा फोटो सोशल मी़डियावर टाकताना मुंबई फ्रँचाईजीने ‘पनिशमेंट जंपसूट परतले आहेत,’ असा मथळा दिला आहे. (IPL 2024 Mumbai Indians)
𝑷𝒖𝒏𝒊𝒔𝒉𝒎𝒆𝒏𝒕 𝒐𝒖𝒕𝒇𝒊𝒕 𝒊𝒔 𝒃𝒂𝒄𝒌! Find out who arrived late this time 😉➡️ https://t.co/2xqgOxuNDy
Watch the full #MIDaily now on our website & the MI app 🎥#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/72tkNwb0vh
— Mumbai Indians (@mipaltan) April 3, 2024
मुंबईपलटन साईटवर प्रसिद्ध झालेला फोटो हा मुंबई विमानतळावरील आहे. आणि त्यात ईशान किशन, नमन धर, शम्स मुलानी, कुमार कार्तिकेय आणि नुवान थसारा यांनी हा जंपसूट घातलेला दिसतोय. तर पियुष चावला यातील तिघांबरोबर फोटो काढतानाही दिसला. (IPL 2024 Mumbai Indians)
(हेही वाचा – Navneet Rana: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध ठरवले)
Punishment dene ka tareeka kaafi k̴e̴z̴u̴a̴l̴ strict hai 😂💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/pMRz9jqcEd
— Mumbai Indians (@mipaltan) April 3, 2024
यंदाच्या हंगामात मुंबई संघाने रोहित शर्माला हटवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. पण, सलग तीन सामन्यांतील पराभवांमुळे हार्दिकवर टीकेची झोड उठवली जात आहे. तसंच मैदानावर हार्दिकने घेतलेले काही निर्णयही जाणकारांना रुचलेले नाहीत. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी तर मैदानाकच हार्दिकची हुर्यो उडवली आहे. (IPL 2024 Mumbai Indians)
संघ प्रशासन मात्र हार्दिकच्या पाठीशी उभं आहे. आणि बीसीसीआयने टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याचं स्पष्ट केलंय. (IPL 2024 Mumbai Indians)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community