-
ऋजुता लुकतुके
आयपीएलचा (IPL 2024) हंगाम जवळ आलाय तसं फ्रँचाईजींच्या हालचालींनाही वेग आला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचाईजीने गुरुवारी संघासाठीच्या नवीन जर्सीचं अनावरण केलं. मुंबई संघाची ओळख असलेला निळा आणि सोनेरी रंग नवीन जर्सीतही आहे. मुंबई संघाच्या चाहता वर्गाला कौतुकाने मुंबई पलटण असं म्हटलं जातं. आणि मुंबई शहराची ऊर्जा आणि वातावरणात भरून राहणारा, दुमदुमणारा उत्साह या जर्सीच्या रंगात बघायला मिळतो, असं मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) म्हणणं आहे.
प्रसिद्ध डिझायनर मोनिषा जयसिंग यांनी ही जर्सी बनवली आहे. ‘संघासाठीचं समर्पण आणि निष्ठा हे गुण या जर्सीच्या रंगात दिसतात. आणि जर्सीवर एम हे अक्षर पॅटर्नसारखं कोरण्यात आलं आहे,’ असं मोनिषा यांनी या जर्सीचं वर्णन करताना म्हटलं आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचाईजीने आपली नवीन जर्सी ट्विटवर जाहीर केली आहे. ‘आपल्या पुरुष संघाची नवीन जर्सी तयार आहे,’ असं या संदेशात लिहिलं आहे. (IPL 2024)
(हेही वाचा – PM मोदींच्या हस्ते देशभरातील डिजिटल क्रिएटर्सचा गौरव! पहिल्यांदाच कोणाला मिळाले पुरस्कार; वाचा सविस्तर)
𝗠𝗨𝗠𝗕𝗔𝗜 𝗜𝗡𝗗𝗜𝗔𝗡𝗦 🆇 𝗦𝗞𝗘𝗖𝗛𝗘𝗥𝗦
👕 आपली Men’s team 𝕁𝔼ℝ𝕊𝔼𝕐 is here! 🤩
Pre-order here 👉 https://t.co/YfTjNo3fWd#OneFamily #MumbaiIndians #IPL2024 @skechersGOin pic.twitter.com/2tHpWVbSNQ
— Mumbai Indians (@mipaltan) March 7, 2024
निळा रंग हा चांगल्या सुरुवातीचं प्रतीक आहे. तर जर्सीवरील सोनेरी रंग ऊर्जेचं प्रतीक आहे. ‘आमचे खेळाडू जेव्हा निळी आणि सोनेरी रंगातील जर्सी परिधान करतात, तेव्हा मुंबई पलटणची स्वप्न आणि आशा ते पूर्ण करत असतात. आणि ‘मुंबई मेरी जान’हे त्यांचा आत्मा आहे. म्हणून जर्सीवर एम अक्षर कोरलेलं आहे. ही जर्सी घातलेला खेळाडू आणि चाहता यांच्यासाठी ही जर्सी म्हणजे अभिमानाची गोष्ट असते,’ असं मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्रशासनाने जर्सी अनावरण करताना म्हटलं आहे. (IPL 2024)
येत्या २२ मार्चला आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ आपला पहिला सामना २४ मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community