IPL 2024, Nicholas Pooran : टी-२० क्रिकेटमधील हाणामारीचं गमक सांगतोय निकोलस पुरन

लखनौ सुपरजायंट्स संघाचा घणाघाती फलंदाज निकोलस पुरन या हंगामात दणक्यात कामगिरी करतोय

200
Nicholas Pooran : लखनौ सुपरजायंट्सनी निकोलस पूरनला राखून ठेवण्यासाठी मोजले १८ कोटी रुपये
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल (IPL 2024) आणि एकूणच टी-२० क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटचं महत्त्व वेगळं सांगायला नको. अलीकडेच विराट कोहली, फाफ दू प्लेसिस यांच्या सारख्या ज्येष्ठ खेळाडूंच्या चांगल्या सरासरीच्या तुलनेत युवा खेळाडू तगड्या स्ट्राईक रेटच्या जोरावर संघाला विजय मिळवून देत असल्याचं चित्र समोर आलं आहे. पण, या स्ट्राईक रेटच्या नादात डावाच्या सुरुवातीलाच फलंदाजाला मोठ्या फटक्यांचा धोका पत्करावा लागतो.

आणि अशा फलंदाजीचं दडपणही येतं. हे दडपण कसं सांभाळायचं, असा प्रश्न लखनौ सुपरजायंट्सचा घणाघाती फलंदाज निकोलस पुरनला (Nicholas Pooran) अलीकडेच विचारण्यात आला. टि-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यशाचं गमक काय, या प्रश्नावर निकोलस म्हणाला, ‘वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्याकडील कौशल्य वापरण्याची हातोटी अंगात असली पाहिजे. आणि त्याची वेगळी तयारी करण्याचीही गरज आहे. काही वेगळ्या प्रकारचे फटके खेळायला लागतात. आणि त्यावर मेहनत घेण्याची तयारी पाहिजे.’ पुढे निकोलस म्हणतो, ‘पॉवर हिटिंग हे तंत्रच आहे. त्याची वेगळी तयारी करायला हवी. मी मागची काही वर्षं अशा प्रकारच्या फलंदाजीची तयारी करत आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत जबाबदारी ओळखून फलंदाजी करणं हे खरं कसब आहे.’ (IPL 2024)

(हेही वाचा – IPL 2024, Virat Gesture : हार्दिक ट्रोल होताना विराटने केलेल्या मदतीचं होतंय कौतुक)

निकोलस पुरन (Nicholas Pooran) लखनौ संघासाठी तारणहार ठरला आहे. ५ सामन्यांत आतापर्यंत त्याने १७८ धावा केल्या आहेत. पण, त्याचा स्ट्राईक रेट १७९ धावांचा आहे. आणि ६४ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या हंगामात निकोलस पुरन लखनौसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. (IPL 2024)

टी-२० क्रिकेट हा छोटा खेळ असल्यामुळे त्यासाठीचं नियोजन वेगळं असायला पाहिजे असं निकोलसला वाटतं. ‘टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना अचूक निर्णय घ्यायची क्षमताही पाहिजे. कारण, एका षटकांत खेळ बदलू शकतो. ते षटक कुठलं हा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो. काही बदल सतत शैलीत करावे लागतात. आणि मोठ्या फटक्यांचा धोकाही पत्करावा लागतो,’ असं शेवटी निकोलस पुरनने सांगितलं. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.