- ऋजुता लुकतुके
सनराझर्सचा अष्टपैलू खेळाडू नितिश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) राजस्थान रॉयल्स विरुद्ध ४२ चेंडूंत ७६ धावांची खेळी केली आणि त्यामुळेच सनरायझर्स हैद्राबादचा संघ दोनशेच्या पार जाऊ शकला. त्याच्या या खेळीचं कौतुक अनेक माजी खेळाडूंनी केलं आहे. आगामी काळात नितिश कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपला डंका पिटेल, असं काही खेळाडूंना वाटतंय. ‘यजुवेंद्र चहल विरुद्ध त्याने केलेली फटक्यांची निवड अप्रतिम होती,’ असं महम्मद कैफने स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना म्हटलं आहे. (IPL 2024 Nitish Kumar Reddy)
‘या खेळाडूंच नाव भविष्यात तुम्हाला सारखं ऐकायला मिळेल,’ असं कैफने बोलून दाखवलं. तर माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणही नितिशवर (Nitish Kumar Reddy) खुश आहे. ‘बेडर क्रिकेट खेळतो तो. निवड समितीचं लक्ष त्याने नक्कीच वेधून घेतलं आहे. आणि भारतीय अ संघासाठी त्याला संधी मिळणं आता सोपं होईल. अष्टपैलू गोलंदाज म्हणून तो तुम्हाला दिसेल,’ असं इरफान म्हणाला. (IPL 2024 Nitish Kumar Reddy)
“Inka naam aap bhavishya mai bahaut sunenge” – Kaif@MohammadKaif & @IrfanPathan praise #NitishReddy‘s fearless approach & his counter-attacking knock against Rajasthan!
Enjoy the best analysis from our #IncredibleStarcast – before, during and after every match on Star Sports!… pic.twitter.com/3i94eXEVUx
— Star Sports (@StarSportsIndia) May 2, 2024
(हेही वाचा – ‘मी काय बघते, यापेक्षा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, Chitra Wagh यांचा अंधारेंना सवाल)
हैद्राबाद संघाने नितिशला संधी देऊन दाखवला विश्वास
नितिश बरोबर ९६ धावांची भागिदारी करणाऱ्या ट्रेव्हिस हेडनेही त्यांच कौतुक केलं आहे. ‘नितिशने (Nitish Kumar Reddy) आपल्या कोषातून बाहेर येत फलंदाजी केली आणि महत्त्वाचं म्हणजे तो खेळताना फलंदाजी खूप सोपी वाटत होती. हीच त्याची खासियत आहे,’ असं हेड म्हणाला. या हंगामात नितिशने ७ सामन्यांत २१९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ७० धावांत ३ बळीही मिळवले आहेत. (IPL 2024 Nitish Kumar Reddy)
२० वर्षीय नितिश कुमार आंध्रप्रदेशकडून खेळतो. गेल्या हंगामात रणजी करंडक स्पर्धेत नितिशने ७ सामन्यांत ३६६ धावा केल्या होत्या. त्यामुळे तो प्रकाशझोतात आला आणि त्यानंतर २०२३ च्या आयपीएल (IPL) हंगामात हैद्राबादने त्याला त्याची मूळ किंमत २० लाखांत खरेदी केलं. पण, हैद्राबाद संघाने त्याला वेळोवेळी संधी देऊन त्याच्यावर विश्वासही दाखवलाय. संघाचा तो महत्त्वाचा मधल्या फळीतील फलंदाज आहे. (IPL 2024 Nitish Kumar Reddy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community