IPL 2024, PBKS vs KKR : पंजाबने दुसऱ्या डावात २६२ धावा करत जिंकला सामना, फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले 

IPL 2024, PBKS vs KKR : पंजाब विरुद्ध कोलताना सामन्यांत एकूण ५२३ धावा झाल्या

220
IPL 2024, PBKS vs KKR : पंजाबने दुसऱ्या डावात २६२ धावा करत जिंकला सामना, फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले 
IPL 2024, PBKS vs KKR : पंजाबने दुसऱ्या डावात २६२ धावा करत जिंकला सामना, फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले 
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण चौदा वेळा दोनशेची धावसंख्या पार झाली आहे. पण, कोलकाता नाईटरायडर्स आणि पंजाब किंग्ज (IPL 2024, PBKS vs KKR) या सामन्यांत तर कहरच झाला. पंजाबने धावांचा पाठलाग करतानाची सर्वोच्च विजयी धावसंख्या नोंदवली. विजयासाठी आवश्यक २६२ धावा पंजाबने केल्या त्या फक्त दोन गडी गमावत. आठ चेंडू राखून. जिमी बेअरस्टोचं (Jimmy Bairstow) शतक (४८ चेंडूंत १०८ धावा) आणि शशांक सिंगने (Shashank Singh) केलेल्या २८ चेंडूंत ६८ धावा यामुळे पंजाबने हा विजय मिळवला.  (IPL 2024, PBKS vs KKR)

या विजयाबरोबरच आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीचे अनेक विक्रमही मोडीत काढले. फक्त आयपीएलच नाही तर टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी पाठलाग करतानाची विजयी धावसंख्या आहे. या सामन्यातील इतरही विक्रमांवर एक नजर टाकूया, (IPL 2024, PBKS vs KKR)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ठाण्यात भंगारात सापडले आठ EVM मशीन  )

टी-२० क्रिकेटमधील पाठलाग करतानाची सर्वाधिक धावसंख्या, 

पंजाब किंग्ज – २६२/2 पंजाब किंग्ज वि. कोलकाता नाईटरायडर्स (आयपीएल २०२४)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – २६२/७, वि. सनरायझर्स हैद्राबाद (आयपीएल २०२४)

दक्षिण आफ्रिका – २५४/७, वि. वेस्ट इंडिज (सेंच्युरियन २०२३)

मिडलसेक्स – २५४/, वि. सरे काऊंटी (टी-२० ब्लास्ट २०२३)

क्वेटा ग्लॅडिएटर्स – २५३/८ वि, मुलतान सुलतान (पाकिस्तान प्रिमिअर लीग २०२३)

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक षटकार, 

२४, पंजाब विरुद्घ कोलकाता (कोलकातान, २०२४)

२२, हैद्राबाद वि. बंगळुरू (बंगळुरू, २०२४)

२२, हैद्राबाद वि. दिल्ली (दिल्ली, २०२४)

२१, बंगळुरू वि. पुणे (बंगळुरू, २०२३)

(हेही वाचा- Mumbai Pune Expressway : खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक घेतला पेट, ३६ प्रवाशी थोडक्यात बचावले)

नेपाळने आशियाई क्रीडास्पर्धे (Asian Games) दरम्यान गेल्यावर्षी होआंगझाओमध्ये २६ षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. त्याच सामन्यात त्यांनी ३ बाद ३१४ ही टी-३० मधील सर्वोत्तम धावसंख्याही नोंदवली. पण, तेव्हा समोरचा प्रतिस्पर्धी संघ दुबळा मंगोलियाचा होता. त्यामुळे तो सामना इथं गृहित धरलेला नाही. (IPL 2024, PBKS vs KKR)

टी-२० सामन्यांतील सर्वाधिक षटकार, 

४२, पंजाब वि. कोलकाता (कोलकाता, २०२४)

३८, हैद्राबाद वि. मुंबई (हैद्राबाद, २०२४)

३८, हैद्राबाद वि. बंगळुरू (बंगळुरू, २०२४)

३७, बलाख लिजंड्स वि. काबूल झ्वनान (शारजा, २०१८/१९)

(हेही वाचा- Uttarakhand Wildfire : उत्तराखंडच्या जंगलांमध्ये भीषण वणवा, आयटीआय भवन जळालं)

आयपीएलमध्ये सामन्यात सर्वाधिक धावा, 

५४९, हैद्राबाद वि. बंगळुरू, (बंगळुरू, २०२४)

५२३, हैद्राबाद वि. मुंबई (हैद्राबाद, २०२४)

५२३, कोलकाता वि. पंजाब (कोलकाता, २०२४)

४६९, चेन्नई वि. राजस्थान (चेन्नई, २०१०)

४६५, दिल्ली वि. हैद्राबाद (दिल्ली, २०२४)

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग, 

२६२, पंजाब वि. कोलकाता (कोलकाता, २०२४)

२२४, राजस्थान वि. पंजाब (शारजा, २०२०)

२२४, राजस्थान वि. कोलकाता (कोलकाता, २०२४)

२१९. मुंबई वि. दिल्ली (मुंबई, २०२१)

(हेही वाचा- Swine Flu: महाराष्ट्राला स्वाइन फ्लूचा धोका? मालेगावात दोघांचा मृत्यू)

टी-२० क्रिकेटमधील मोठे यशस्वी पाठलाग, 

२६२, पंजाब वि. कोलकाता (कोलकाता, २०२४)

२५९, द आफ्रिका वि. वेस्ट इंडिज (सेंच्युरियन २०२३)

२५३, मिडलसेक्स वि. सरे (ओव्हल २०२३)

२४४, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड (ऑकलंड, २०१८)

२४३, बल्गेरिया वि. सर्बिया (सोफिया, २०२२)

२४३, मुलतान सुलतान वि. पेशावर झाल्मी (पीएसएल २०२३)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.