- ऋजुता लुकतुके
पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (IPL 2024, PBKS vs KKR) सामन्यांत फलंदाज चेंडू टोलवत होते, ते पाहायला खूप मजा येत होती. षटकारांची आतषबाजी बघायला छानच वाटते. समालोचकही प्रत्येक षटकाराचं वेगवेगळं वर्णन करण्यासाठी झटत होते. पंजाबने कोलकाताना पहिली फलंदाजी दिली आणि त्यांनी निर्धारित २० षटकांत ६ बाद २६१ धावा केल्या तेव्हा ही धावसंख्या सामन्यात विजय मिळवून देईल असंच वाटत होतं. सुनील नरेनच्या (Sunil Narine) ७१ आणि फिल सॉल्टच्या (Phil Salt) ७८ धावांनी कोलकाताचा डाव सजला होता. (IPL 2024, PBKS vs KKR)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ठाण्यात भंगारात सापडले आठ EVM मशीन )
पण, दुसऱ्या डावात पंजाबच्या जिमी बेअरस्टो (Jimmy Bairstow) आणि शशांक सिंग (Shashank Singh) यांचा धडाका सुरू झाला. बेअरस्टोने तर ४८ चेंडूंत १०८ धावा केल्या. शशांकने २८ चेंडूंत ६८ धावा करत पंजाबला विजयीही केलं. अगदी सुरुवातीपासून पंजाबचे फलंदाज पाठलाग करताना गोंधळून गेले नाहीत. अशावेळी मग सॅम करनच्या (Sam Curran) ४ षटकांत ६० धावा निघाल्या. तर कासिगो रबाडाच्या ३ षटकांत ५५ धावा निघाल्या. रबाडाला शेवटचं षटक टाकण्याची गरजच पडली नाही. त्यापूर्वीच पंजाब जिंकलं. (IPL 2024, PBKS vs KKR)
सामन्यानंतर सॅम करन म्हणाला, ‘क्रिकेटचा बेसबॉल झालाय.’ दुसरीकडे भारताचा आघाडीचा फिरकीपटू आर अश्विनने (Ravichandran Ashwin) लागलीच एक ट्विट केलं. त्यात तर त्याने आवाहन केलंय की, ‘गोलंदाजांना वाचवा.’ त्याला एसओएस इशाराही अश्विनने दिला आहे. (IPL 2024, PBKS vs KKR)
“Save the bowlers” someone plsss
🆘🆘🆘 #KKRvsPBKS #IPL2024— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) April 26, 2024
(हेही वाचा- IPL 2024, PBKS vs KKR : पंजाबने दुसऱ्या डावात २६२ धावा करत जिंकला सामना, फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले )
या सामन्यात कोलकाताच्या डावात १८ षटकार आणि २२ चौकारांची आतषबाजी झाली. तर पंजाबच्या डावात २४ षटकार आणि १५ चौकार पाहायला मिळाले. इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमामुळे फलंदाज अधिक मोकळेपणाने फलंदाजी करत आहेत. त्यामुळे या हंगामात १४ वेळा दोनशेच्या वर धावसंख्या झालेली आहे. तब्बल पाचवेळा संघांनी अडिचशेच्या वर मजल मारली आहे. (IPL 2024, PBKS vs KKR)
म्हणूनच आयपीएल आणि टी-२० प्रकार हा फक्त फलंदाजांचा खेळ उरला आहे का, असा प्रश्न अश्विनने विचारला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community