- ऋजुता लुकतुके
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार सलामीवीर सुनील नरेन (Sunil Narine) सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. आताही पंजाब विरुद्ध ३१ चेंडूंत त्याने ७१ धावा केल्या. आणि फिल सॉल्टबरोबर १३८ धावांची भागिदारी करत त्याने कोलकाताला २६१ ही धावसंख्या रचण्यात मोठा वाटा उचलला. त्याच्या या खेळीत ४ षटकार आणि ९ चौकार होते. या कामगिरीमुळे पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सुनील नरेन विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेडच्या पंक्तीत बसला आहे. (IPL 2024 PBKS vs KKR)
𝐁𝐥𝐨𝐜𝐤𝐛𝐮𝐬𝐭𝐞𝐫 at the box office 📽️ pic.twitter.com/pom9hJZq5X
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 26, 2024
पॉवरप्लेचा विचार केला तर नरेनने आतापर्यंत या हंगामात १७७ च्या स्ट्राईकरेटने २०४ धावा जमवल्या आहेत. तर २५९ धावांसह ट्रेव्हिस हेड या विक्रमाच्या बाबतीत सर्वात वर आहे. (IPL 2024 PBKS vs KKR)
Ladies & gentlemen, presenting the highest opening partnership of #TATAIPL2024, courtesy Sunny & Phil 🫡 pic.twitter.com/vlSVV0I7KT
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 26, 2024
(हेही वाचा – MTDC: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एमटीडीसी रिसॉर्टच्या दरात सवलत द्यावी, पर्यटकांची शासनाकडे मागणी)
२०२४ च्या हंगामात पॉवर प्लेमध्ये यशस्वी झालेले फलंदाज
ट्रेव्हिस हेड (सनरायझर्स हैद्राबाद) – २५९ धावा (स्ट्राईक रेट २२९.२०)
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – २१६ धावा (स्ट्राईक रेट १५५.३९)
सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स) – २०४ धावा (स्ट्राईक रेट १७७.३९)
अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैद्राबाद) – २०१ धावा (स्ट्राईक रेट २३३.७२)
फिल सॉल्ट (कोलकाता नाईट रायडर्स) – १९५ धावा (स्ट्राईक रेट १७५.४५) (IPL 2024 PBKS vs KKR)
कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सर्वाधिक षटकार
आंद्रे रसेल – २०१
नितिश राणा – १०६
सुनील नरेन – ८८
युसुफ पठाण – ८५
रॉबिन उथप्पा – ८५ (IPL 2024 PBKS vs KKR)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community