-
ऋजुता लुकतुके
गुजरात टायटन्सबरोबरचा सामना पावसात वाहून गेल्यावर सनरायझर्स हैद्राबादने १३ सामन्यांत १५ गुण मिळवत बाद फेरी गाठली आहे. इतकंच नाही तर त्यांना उर्वरित सामना जिंकून दुसऱा क्रमांक पटकावण्याचीही संधी आहे. तर चेन्नईला बंगळुरू विरुद्धचा सामना जिंकून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. त्यामुळे आता बाद फेरी गाठलेल्या संघांमध्येही क्रमवारीतील चुरस कायम राहणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना १४ गुणांवर राहूनही सरस धावगतीच्या आधारे बाद फेरीची आशा आहे. चेन्नईला बंगळुरू विरुद्धचा सामना गमावला तरीही तो कमी फरकाने गमावण्याची काळजी घ्यावी लागेल. तर सरस धावगतीच्या आधारे ते बाद फेरीत पोहोचू शकतात.
थोडक्यात, बाद फेरीचे संघ हळू हळू ठरत असले तरी क्रमवारीवरूनही चुरस आहेच. चेन्नई आणि बंगळुरूचे संघ सध्या बाद फेरीच्या सगळ्यात जवळ आहेत. पण, दोघांपैकी एकालाच तिथे जाता येणार आहे. अशावेळी बाद फेरीच्या नेमक्या शक्यता काय आहेत, ते एकदा पाहूया,
(हेही वाचा – Covaxin Vaccine: कोविशिल्डनंतर आता ‘कोवॅक्सिन’ लसीचीही चाचणी, संशोधकांनी सांगितलेले दुष्परिणाम कोणते?)
कोलकाता नाईट रायडर्सचा अव्वल क्रमांक अभेद्य आहे
राजस्थान रॉयल्सनी कोलकाता विरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकला तर ते १८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आरामात पोहोचतील. पण, पंजाब विरुद्धचा सामना त्यांनी गमावला तर त्यांचे १६ गुणच राहतील. आणि त्या परिस्थितीत शेवटचा साखळी सामना जिंकून सनरायझर्स हैद्राबादला दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संघी असेल. (IPL 2024)
सनरायझर्स हैद्राबाद १५ गुणांसह सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आता त्यांनी आपला शेवटचा साखळी सामना जिंकला आणि राजस्थान हरले तर हैद्राबाद दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. पण, हा सामनाच त्यांनी गमावला तर ते राजस्थानला मागे टाकू शकणार नाहीत. आणि चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्याच्या निकालावर ते तिसऱ्या क्रमांकावर राहणार की चौथ्या हे ठरेल.
चेन्नई सुपर किंग्जसाठी गणित अगदी सरळ सोपं आहे. बंगळुरू विरुद्धचा सामना जिंकला तर त्यांचे १६ गुण होतात. आणि इतर सामन्यांच्या निकालावरून ते तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहतील. पण, बाद फेरीतील प्रवेश निश्चित असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आपला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. तो जिंकून त्यांचे १४ गुण होतील. आणि मग इतर सामन्यांच्या निकालावर त्यांना बाद फेरीची अपेक्षा बाळगता येईल. कारण, हा सामना जिंकल्यास चेन्नई, दिल्ली आणि लखनौ या संघांना धाव सरासरीच्या बाबतीत मागे टाकण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. दिल्ली आणि लखनौचे संघ त्या मानाने धाव सरासरीत मागे आहेत. पण, चेन्नई विरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही बंगळुरूला विजय तर मिळवावा लागेलच. पण, सरासरीतही चेन्नईला मागे टाकावं लागेल. उदा. २०० धावांचा पाठलाग करताना बंगळुरूला १८.१ षटकांत विजय मिळवावा लागेल. आणि बंगळुरूची पहिली फलंदाजी असेल आणि त्यांनी २०० धावा केल्या. तर त्यांना चेन्नईला १८२ किंवा त्याच्या आत रोखावं लागेल. तर बंगळुरू १४ गुणांसह बाद फेरीत पोहोचू शकतात. (IPL 2024)
चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्यावरच इतर संघांचंही भवितव्य ठरणार आहे. कारण, या सामन्यात चेन्नई जिंकली तर बाद फेरीचा चौथा संघ आपोआपच ठरेल. पण, बंगळुरू जिंकले आणि त्यांनी आवश्यक धावगतीही राखली. तर त्यांचं पारडं बाद फेरीसाठी वर असेल. (IPL 2024)
बंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि लखनौ हे संघ प्रत्येकी १४ गुणांवर असतील तर सरस धावगती बाद फेरीचा चौथा संघ ठरवेल. आणि यात बंगलुरूला जास्त आशा असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community