- ऋजुता लुकतुके
रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) दिल्लीवर मिळवलेल्या विजयानंतर आयपीएलची बाद फेरीची समीकरणं अचानक बदलली आहेत. या विजयामुळे बंगळुरू संघाला बाद फेरीतपर्यंत पोहोचण्याच्या शर्यतीत चांगलंच बळ मिळालं आहे. एकतर विजय ४७ धावांनी त्यामुळे मोठा होता. गुणतालिकेत ते एकदम पाचव्या स्थानावर पोहोचले. इतकंच नाही तर आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नईचा पराभव करत बाद फेरी गाठण्याची आशाही ते आता बाळगू शकतात. अर्थात, त्यासाठी विजय आणि तो ही मोठ्या फरकाने आवश्यक असेल. त्यासाठीची नेमकी गणितं काय आहेत से समजून घेऊया. (IPL 2024, Playoffs Scenario)
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी बाद फेरी निश्चितपणे गाठली आहे. तर त्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद या दोन संघांचे सध्या प्रत्येकी १४ गुण आहेत. हैद्राबादला उर्वरित दोन सामन्यातून २ गुण मिळवले तरी ते बाद फेरीत जाणार आहेत. तर चेन्नईलाही बंगळुरूविरुद्ध विजय पुरेसा आहे. त्यांचं किमान चौथं स्थान त्यामुळे निश्चित होईल. पण, या दोघांनी उर्वरित तीनही सामने गमावले तर गुणतालिकेचं गणित अगदी विचित्र होऊन बसेल. (IPL 2024, Playoffs Scenario)
(हेही वाचा- Flood In Indonesia: इंडोनेशियामध्ये पावसाचा हाहाकार! थंड लाव्हामुळे ३७ जणांचा मृत्यू)
बंगळुरू, दिल्ली आणि पंजाब हे तीन संघ सध्या प्रत्येकी १२ गुणांवर आहेत. यातील बंगळुरू संघाची धावगती सरस असल्यामुळे त्यांच्या बाद फेरीचा विचार सध्या करूया. शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई विरुद्ध कसा विजय मिळवावा लागेल याचा आढावा घेऊया, (IPL 2024, Playoffs Scenario)
With a ‘Q’ to their name, #KKR stand tall at the 🔝 of the points table 💜
Time is running out for the others to qualify for the #TATAIPL playoffs‼️@KKRiders pic.twitter.com/j03BMgSJMU
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
बंगळुरूसाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे ती लखनौ सुपरजायंट्स संघाने उर्वरित दोन सामन्यांपैकी दोनही न जिंकणे. कारण, त्यांनी दोनही सामने जिंकले तर त्यांचे १६ गुण होतील. आणि ते तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. आणि मग बंगळुरूला सनरायझर्स हैद्राबादने आपले दोनही सामने गमावले तरंच बाद फेरीचा विचार करता येईल. (IPL 2024, Playoffs Scenario)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: मोबाईलसह प्रवेशबंदीवरुन पोलीस व मतदारांमध्ये वाद!)
लखनौने दोन्हीपैकी एकच सामना जिंकला तर मात्र बंगळुरूला सरस धावगतीच्या आधारे तिसरा किंवा चौथा क्रमांक पटकावता येईल. जर ही अटीतटीची लढाई चेन्नई आणि बंगळुरूच्या सामन्यापुरती उरली, म्हणजे हा एक सामना जिंकून बंगळुरूला बाद फेरीत जाता येणार असेल तर त्यांना चेन्नईपेक्षा सरस धावगती गाठावी लागेल. आणि त्यासाठी पहिली फलंदाजी करून दोनशेच्या वर धावा केल्या तर त्यांना चेन्नईला किमान १८ धावांनी हरवावं लागेल. आणि दुसरी फलंदाजी करताना दोनशेच्या वर धावांचा पाठलाग करत असतील तर त्यांना किमान ११ चेंडू राखून हा विजय मिळवावा लागेल. (IPL 2024, Playoffs Scenario)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community