IPL 2024 : राजस्थान संघाने रवीचंद्रन अश्विनचं केलं ‘असं’ भावपूर्ण स्वागत 

IPL 2024 : अश्विनने अलीकडेच ५०० कसोटी बळींचा टप्पा पूर्ण केला आहे 

183
IPL 2024 : राजस्थान संघाने रवीचंद्रन अश्विनचं केलं ‘असं’ भावपूर्ण स्वागत 
IPL 2024 : राजस्थान संघाने रवीचंद्रन अश्विनचं केलं ‘असं’ भावपूर्ण स्वागत 
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलचा (IPL 2024) नवीन हंगाम शुक्रवारपासून सुरू होतोय. आणि जवळ जवळ सगळ्याच संघांसाठी हे एकत्र येण्याचे दिवस आहेत. कारण, आतापर्यंत खेळाडू आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त होते. पण, आता वेळ आहे ती आयपीएलसाठी (IPL 2024) एकत्र येण्याची. राजस्थान रॉयल्स फ्रँचाईजीने (Rajasthan Royals Franchise) खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात फ्रँचाईजीचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) भावपूर्ण पद्धतीने स्वागत केलं. (IPL 2024)

(हेही वाचा – BJP : भाजपा कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्तात का वाढ केली ?)

अलीकडेच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत अश्विनने कसोटीतील ५०० बळींचा टप्पा ओलांडला. ही कामगिरी करणारा अनिल कुंबळे नंतरचा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अशावेळी अश्विनला (Ravichandran Ashwin) मानवंदना म्हणून सॅमसनने अश्विनला ५०० क्रमांकाची जर्सी भेट दिली. राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या सोहळ्याची क्षणचित्रं शेअर करण्यात आली आहेत. (IPL 2024)

सॅमसनने या कार्यक्रमात अश्विनला (Ravichandran Ashwin) जर्सी बहाल केल्यावर अश्विनही थोडा भावूक झाला. त्यानंतर राजस्थान संघातील खेळाडूंनी अश्विनसमोर झुकून त्याला मानवंदना दिली. या कार्यक्रमानंतर मात्र सगळ्यांचं लक्ष आता नवीन हंगामाकडे लागलं आहे. यंदाची मोहीम राजस्थान संघ लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाबरोबरच्या सामन्याने सुरू करणार आहे. (IPL 2024)

(हेही वाचा – Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी केली ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी ?; झडतीत सापडली कागदपत्रे)

राजस्थान फ्रँचाईजीने (Rajasthan Royals Franchise) यंदा संघातही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. सवाई मानसिंग या घरच्या मैदानावर सध्या रोवन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर, आबिद मुश्ताक आणि नांद्रे बर्गर हे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. (IPL 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.