- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL 2024, RCB in Playoff) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील शनिवारी झालेला सामना अपेक्षेप्रमाणेच शेवटपर्यंत रंगला. आणि अखेर चेन्नईला सरस धावगतीसाठी ९ आणि विजयासाठी २४ धावा कमी पडून त्यांचा पराभव झाला. आणि हंगामात ७ पराभवांमुळे अडचणीत सापडलेल्या बंगळुरू संघाने उर्वरित सहा सामने सलग जिंकत बाद फेरी गाठण्याचा पराक्रम केला. चेन्नई विरुद्धचा सामनाही चांगलाच रंगला. धोणी आणि जाडेजा यांनी शेवटच्या दोन षटकांत षटकारांची आतषबाजी करत चेन्नईला बाद फेरीच्या जवळ आणलं होतं. पण, यश दयालने मोक्याच्या क्षणी धोणीचा बळी मिळवला. आणि मग दोन चेंडूंत ११ धावा हव्या असताना जाडेजाला एकही धाव घेऊ दिली नाही. त्यामुळे बंगळुरूचा विजय साध्य झाला. (IPL 2024, RCB in Playoff)
(हेही वाचा- Lok Sabha Election Voting : वीर सावरकरांच्या वंशजांनी बजावला मतदानाचा हक्क)
विजयाचं पारडं सतत बदलत असताना मैदानावर दोन्ही बाजूचे समर्थक गप्प होते. दडपण चाहत्यांच्या चैहऱ्यावरही दिसत होतं. पण, अखेर चेन्नईला ७ बाद १९१ धावांवर रोखून बंगळुरूने विजय आणि बाद फेरीत प्रवेश दोन्ही मिळवलं. त्यानंतर मात्र बंगळुरूचा चाहता वर्ग एकदम जागा झाला. ‘कोहली, कोहली’चा गजर सुरू झाला. आणि बक्षीस वितरण कार्यक्रमातही लोकांचा आनंद सुरूच होता. त्यामुळे मग बंगळुरूचा कर्णधार फाफ दू प्लेसिस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रेक्षकांना मानवंदना देण्यासाठी चिन्नास्वामी मैदानाला एक फेरी मारली. (IPL 2024, RCB in Playoff)
📽️ RAW Reactions post a surreal win ❤️
When emotions spoke louder than words at Chinnaswamy 🏟️
A special lap of honour for the @RCBTweets fans that continue to believe in their side 👏👏#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/CrBQUBRKEI
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
३२ चेंडूंत ५५ धावा करून बंगळुरूला चांगली सुरुवात करून देणारा फाफ डू प्लेसी (Faf du Plessis) सामनावीर ठरला. ‘काय इथलं वातावरण आहे! ही हंगामातील सगळ्यात सुंदर रात्र आहे,’ असं त्याच्या तोंडून आपोआप निघालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आतापर्यंत सहा वेळा बाद फेरीत पोहोचला आहे. तर चेन्नईचा संघ फक्त दुसऱ्यांदा साखळीतच गारद झाला. बाद फेरीत आता बंगळुरूला तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी एलिमिनेटरचा सामना खेळाला लागेल. आणि तो जिंकला तर पहिली क्वालिफायर हरलेल्या संघाशी त्यांची उपान्त्य फेरीत गाठ पडेल. (IPL 2024, RCB in Playoff)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ओडिशातील निवडणूक रोमांचक वळणावर, बीजेडीपुढे अस्तित्त्वाचे संकट)
बुधवारी २२ मे ला एलिमिनेटर सामना अहमदाबाद इथं खेळवण्यात येईल. (IPL 2024, RCB in Playoff)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community