-
ऋजुता लुकतुके
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएल (IPL 2024) सामन्यात २५ धावांनी पराभव झाला आहे. सनरायझर्सने तीन गड्यांच्या मोबदल्यात २८७ धावा केल्या आणि त्याच मोसमात केलेल्या २७७ धावांचा त्यांचाच विक्रम मोडला. प्रत्युत्तरात आरसीबीला सात गड्यांच्या मोबदल्यात २६२ धावाच करता आल्या.
हैदराबादने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून २८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीनेही ६ गडी गमावून २६२ धावा केल्या. हा सामना अवघ्या २५ धावांनी जिंकण्यात हैदराबादला यश आले. या सामन्यात अनेक विक्रम झाले. या हंगामात सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा आपलाच विक्रम मोडीत काढला. आयपीएलमधील (IPL 2024) ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
(हेही वाचा – Supreme Court : घड्याळाचे काटे उलटे फिरवू नका; मतपेटीच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावले)
We come out on top in a record-breaking game of cricket 🙌#PlayWithFire #RCBvSRH pic.twitter.com/f4uekgz5kW
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 15, 2024
आरसीबीच्या संघांची स्थिती पाहता प्ले ऑफच्या पोहोचण्यासाठी किमान आठ विजय आवश्यक आहेत. आरसीबीने सात पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे, त्यामुळे आरसीबीला आता आगामी सर्व सामने जिंकावे लागतील. तसेच सात सामने जिंकूनही दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर आरसीबीला अवलंबून राहावे लागेल. आयपीएल २०१६ मध्ये आरसीबीने पहिल्या सात पैकी पाच सामने गमावूनही अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळीही चाहत्यांना अशाच चमत्काराची प्रतीक्षा असेल. आरसीबीचा संघ २००९, २०११ आणि २०१६ मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र जेतेपद पटकावण्यास त्यांना अपयश आले. (RCB Playoff Chances)
(हेही वाचा – Ayodhya Ram Temple: रामनवमीच्या दिवशी अयोध्येत होणारा सूर्याभिषेक आनंददायी!)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक ५४९ धावा झाल्या. याआधी हा विक्रम हैदराबाद आणि मुंबईयांच्यातील सामन्याच्या नावावर होता, ज्यात ५२३ धावा झाल्या होत्या. रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ८१ चौकार मारले गेले. या सामन्यात ४३ चौकार आणि ३८ षटकार दिसले. आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा हा विक्रम आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community