आयपीएल 2024 (IPL 2024) च्या सर्वात महत्त्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा (RCB vs CSK) पराभव केला. या सामन्यात 27 रन्सने चेन्नईला धूळ चारत आरसीबीच्या टीमने थेट प्लेऑफचं तिकीट गाठलं आहे. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्जचं यंदाच्या सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यानंतर चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) काहीसा नाराज दिसून आला. (IPL 2024)
(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : मुंबईत चोख बंदोबस्तात मतदान, ४० हजार पोलिसांचा फौजफाटा मतदानाच्या दिवशी तैनात)
आरसीबीकडून मिळालेल्या पराभवानंतर ऋतुराज म्हणाला की, “खरं सांगायचे तर मला वाटतंय की, चांगली विकेट होती. पिचला थोडं स्पिन होतं. मला वाटतं या मैदानावर 200 रन्स करता आले असते. आम्ही ठराविक अंतराने विकेट्स गमावत होतो. टी -20 सामन्यात असं होऊ शकतं. एकंदरीत सिझनबद्दल सांगायचं झालं तर 14 सामन्यांपैकी 7 गेम जिंकून मला खूप आनंद झाला आहे. फक्त शेवटचे दोन सामने जिंकता आले नाहीत. (RCB vs CSK) यावेळी टीममधील खेळाडूंना अनेक प्रकारच्या दुखापती झाल्या, दोन मुख्य गोलंदाजांची कमतरता, तसंच कॉन्वेचं फलंदाजीमध्ये अग्रस्थानी नसणं, मला वाटते की, हे तीन खेळाडू नसल्यामुळे मोठा फरक पडला. पहिल्या सामन्यात आमच्यासमोर अनेक आव्हाने होती. यावेळी सीएसकेच्या स्टाफने चांगली कामगिरी केली.” (IPL 2024)
(हेही वाचा –Monsoon Update: अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार! येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस)
पाथिरानाला झालेली दुखापत आमच्यासाठी योग्य ठरली नाही. जेव्हा तुम्हाला दुखापत होते, तेव्हा तुम्हाला टीममध्ये संतुलन निर्माण करावं लागतं आणि प्रत्येक खेळासाठी टीम निवडावी लागते. आम्हाला आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागले. यावेळी दुखापतींचाही विचार करावा लागला. असं ऋतुराज गायकवाड याने सांगितलं आहे. (IPL 2024)
असंभव असा कमबॅक
चेन्नईचा 27 धावांनी पराभव करून आरसीबीने प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. तर यंदाच्या सिझनधील चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास थांबला आहे. 6 सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने सलग 6 सामने जिंकले अन् असंभव असा कमबॅक केला. 8 मे रोजी आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फक्त 3 टक्के असताना आरसीबीने टीमने आपली ताकद दाखवली आणि अखेर प्लेऑफमध्ये धडक दिली. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community