- ऋजुता लुकतुके
बंगळुरू शहरात एका लग्न मंडपातच चक्क आयपीएल सामन्याचं थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवलं जात होतं. गंमत म्हणजे नवरा मुलगा आणि त्याचे मित्र सामन्यात रंगल्यामुळे लग्नाचे विधीही काही काळ थांबले होते. नवरा आणि नवरी जिथे मंडपात उभे होते, त्याच्या शेजारीच एका प्रोजेक्टरवर हा सामना दाखवला जात होता. त्यामुळे जमलेले पाहुणेही ‘आरसीबी, आरसीबी,’ असा जयघोष करत होते. चेन्नई विरुद्धचा हा सामना जसा रंगत गेला, तसं सगळ्यांचंच लक्ष सामन्याकडे लागलं होतं. (IPL 2024 RCB vs CSK)
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आहे. ‘लग्नापेक्षा जेव्हा क्रिकेट जास्त महत्त्वाचं ठरतं,’ अशा मथळ्याखाली एका सोशल मीडिया खात्यावर हा व्हायरल व्हिडिओ शेअर झाला आहे. (IPL 2024 RCB vs CSK)
When cricket is more important than marriage 😂😂
Vc : insta pic.twitter.com/7b18kKEJzR— Raj (@raajcar) May 19, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election Voting : राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क)
बंगळुरूने केल्या इतक्या धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान शनिवारी सामना सुरू झाला तेव्हा कोलकाता, राजस्थान आणि हैद्राबाद हे संघ आधीच बाद फेरीत पोहोचले होते. चौथ्या स्थानासाठी चेन्नईला फक्त विजय किंवा बरोबरी पुरेशी होती. तर बंगळुरूला सरस धावगतीसाठी किमान १७ धावांनी विजय आवश्यक होता आणि चेन्नईला ७ बाद १९१ धावांवर रोखत बंगळुरूने ती कामगिरी साध्य केली. (IPL 2024 RCB vs CSK)
पहिली फलंदाजी करताना बंगळुरूने ५ बाद २१८ धावा केल्या होत्या. सामन्यात शेवटच्या दोन षटकांत रवींद्र जाडेजा (नाबाद ४२) आणि धोनी (२५) यांनी षटकार ठोकत सामन्यांत रंगत आणली होती. पण, अखेर यश दयालने धीर राखत गोलंदाजी केली आणि विजयासाठी २ चेंडूंत ११ धावा हव्या असताना दोन्ही चेंडू निर्धाव टाकत बंगळुरूला विजय मिळवून दिला. (IPL 2024 RCB vs CSK)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community