IPL 2024, RCB vs CSK : बाद फेरीसाठी महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचं सावट, बंगळुरूत शनिवारी पावसाची शक्यता

शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामना दोन्ही संघांचं भवितव्य ठरवणारा आहे

122
IPL 2024, RCB vs CSK : बाद फेरीसाठी महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचं सावट, बंगळुरूत शनिवारी पावसाची शक्यता
IPL 2024, RCB vs CSK : बाद फेरीसाठी महत्त्वाच्या सामन्यावर पावसाचं सावट, बंगळुरूत शनिवारी पावसाची शक्यता
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे चाहते सध्या एकच विनंती वरुण देवाला करत आहेत, की शनिवारी बंगळुरूत बरसू नकोस. कारण, चेन्नई विरुद्धचा सामना बंगळुरूने मोठ्या फरकाने जिंकला आणि सरस धावगतीच्या जोरावर ते वरचढ ठरले तर आणि तरंच त्यांना बाद फेरीची अपेक्षा धरता येणार आहे. याउलट चेन्नईला मात्र पुढे जाण्यासाठी बरोबरीचा एक गुणही पुरेसा ठरणार आहे. आणि नेमक्या अशा वेळी शनिवारी बंगळुरूत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणि शुक्रवारच्या दिवशी पावसामुळे चिन्नास्वामी मैदान आच्छादित ठेवावं लागलं आहे. (IPL 2024)

कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे तीन संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. आणि बाद फेरीतील चौथा संघ चेन्नई सुपर किंग्ज किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एक संघ असेल. दिल्लीचा संघ १४ गुणांसह सध्या पाचव्या स्थानावर असला तरी त्यांची धावगती उणे ०.३७७ इतकी आहे. त्यामुळे शनिवारी बंगळुरूने चेन्नईवर विजय मिळवला तर तीनही संघांचे समान १४ गुण होतील. पण, तरीही सरस धावगतीच्या आधारे चेन्नई किंवा बंगळुरूलाच बाद फेरीची संधी मिळेल. आणि चेन्नईला बाद फेरीसाठी शनिवारच्या लढतीतून एक गुणही पुरेसा आहे. (IPL 2024)

(हेही वाचा – कार्यालयाबाहेरील राड्यानंतर Mihir Kotecha यांचं ठाकरे गटाला जाहीर आव्हान!)

१८ मे ला बंगळुरूमध्ये पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळी साडेसातला हा सामना सुरू होईल. आणि नेमकं याच वेळी ‘हवामान ढगाळ व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता’ असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ॲक्युवेदर या ॲपनेही तसाच अंदाज दिला आहे.

110199077.jpg

बंगळुरूसाठी बाद फेरीचं गणित,

सामन्यात एका डावात २०० धावा गृहित धरल्या. तर पहिली फलंदाजी करून बंगळुरूने २०० धावा केल्यावर त्यांना चेन्नईवर किमान १८ धावांनी विजय मिळवावा लागेल. बंगळुरूने धावांचा पाठलाग केल्यास आणि आव्हान २०१ किंवा त्याहून जास्त असल्यास त्यांना किमान ११ चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. तरंच बंगळुरूची धावगती चेन्नईपेक्षा सरस ठरेल. आणि त्यांना बाद फेरीची आशा बाळगता येईल. (IPL 2024)

चेन्नईसाठी बाद फेरीचं गणित,

चेन्नईचे सध्या १४ गुण आहेत. त्यामुळे त्यांना बाद फेरीसाठी १ गुणही पुरेसा आहे. त्यामुळे पावसात खेळ वाहून गेला, तर चेन्नई आपोआप बाद फेरीत पोहोचेल. आणि बंगळुरूवर निसटता विजय जरी मिळवला तरी ते बाद फेरीत निश्चितपणे पोहचतील. पण, बंगळुरूकडून पराभव झाला तर त्यांना धावगतीवर लक्ष ठेवावं लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.