- ऋजुता लुकतुके
आयपीएल किंवा एकूणच टी-२० (T-20) क्रिकेट (IPL 2024, Record Sixes) हा चौकार आणि षटकारांचा खेळ आहे हे खरं असलं तरी यंदाच्या आयपीएलमध्ये टोलेजंग फटक्यांनी कहर केला आहे. बुधवारी आयपीएलमधील ५७ वा सामना झाला. आणि तेवढ्यात हंगामातील १००० षटकार पूर्ण झाले आहेत. चेंडूंच्या तुलनेनं सांगायचं झालं तर १३,०७९ चेंडूंमध्ये आतापर्यंत १,००० षटकार ठोकले गेले आहेत. हा एक विक्रम आहे. कमीत कमी वेळेत १,००० षटकारांची नोंद या हंगामात झाली आहे. (IPL 2024, Record Sixes)
(हेही वाचा- Mumbai Airport Runway: ६ तास बंद राहणार, जाणून घ्या काय आहे कारण)
विशेष म्हणजे २०२३ आणि २०२२ या मागील दोन हंगामातही षटकारांचे जुने विक्रम सातत्याने मोडीत निघाले आहेत. खेळाचा वेग गेल्या दोन वर्षांत प्रचंड वाढला आहे. २०२३ मध्ये एकूण १,१२४ षटकारांची नोंद झाली. तर २०२२ मध्ये १,०६४ षटकारांची नोंद झाली होती. २०२३ मध्ये १००० षटकारांसाठी १५,३९० चेंडू लागले होते. तर २०२२ मध्ये १६,२६९ चेंडू. (IPL 2024, Record Sixes)
आयपीएलमध्ये षटकारांचा नवा विक्रम
२०२४ – १३,०७९ चेंडू
२०२३ – १५,३९० चेंडू
२०२२ – १६,२६९ चेंडू
(हेही वाचा- Hardik Pandya Hairstyle : हार्दिक पांड्याच्या ९ प्रसिद्ध हेअरस्टाईल)
२०२२ मध्ये आयपीएलमध्ये इम्पॅक्ट खेळाडूचा नियम लागू झाला. तेव्हापासून आयपीएलमधील फलंदाजी अधिक आक्रमक झाली आहे. (IPL 2024, Record Sixes)
1⃣0⃣0⃣0⃣ SIXES in #TATAIPL 2024 💥
Krunal Pandya gets going for Lucknow Super Giants 💪
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#SRHvLSG pic.twitter.com/OcHvFJSXmq
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
भारतीय खेळपट्ट्या या फलंदाजीला पोषक असतात. इथं चेंडू कमी स्विंग होतो. तसंच फिरकीपटूला पुढे सरसावून मारणं तुलनेनं सोपं असतं. त्यामुळे पहिल्या हंगामापासून आयपीएल हा आक्रमक फलंदाजांचा खेळ आहे. प्रत्येक हंगामात खेळ अधिकाधिक फलंदाजांना धार्जिणा झाला आहे. फलंदाजांनी विविध प्रकारच्या गोलंदाजांना खेळून काढण्यासाठी नवीन प्रकारचे फटकेही शोधून काढले आहेत. बेडर फलंदाजीचा विशेष सराव केला जात आहे. (IPL 2024, Record Sixes)
(हेही वाचा- Sudhakar Badgujar: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस!)
यंदाच्या हंगामात तब्बल ८ वेळा अडिचशेपेक्षा मोठी धावसंख्या रचली गेली. एकाच सामन्यात दोन डावांत अडिचशेचा टप्पा गाठण्याची वेळही दोनदा आली. म्हणजे ४० षटकांत ५०० च्या वर धावा पहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे षटकारांचं महत्त्व वाढलं आहे. (IPL 2024, Record Sixes)