२६ नोव्हेंबर हा आयपीएलमधील १० संघांसाठी आपल्याकडे कुठले खेळाडू कायम ठेवणार आणि कुणाला मुक्त करणार हे जाहीर करण्याचा दिवस होता. त्यानुसार आता १९ डिसेंबरच्या लिलावाचं चित्र स्पष्ट झालं आहे.विश्वचषक स्पर्धा संपल्या संपल्या आता क्रिकेट विश्वात पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. कारण, २६ नोव्हेंबरला आयपीएलमधील दहाही संघांनी नियमाप्रमाणे पुढील हंगामासाठीची संघ बांधणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सध्याचे कुठले खेळाडू कायम राखणार आणि कुठले खेळाडू लिलावासाठी मुक्त करणार हे या संघांनी रविवारी जाहीर केलं. (IPL 2024 )
यात गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पांड्याचं नाव कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत जाहीर केल्यामुळे काही काळ खळबळ माजली होती. कारण, हार्दिकला आपल्याकडे घेण्यासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक होते. पण, अखेर हार्दिकला लिलावाच्या माध्यमातून नाही तर खेळाडूंची देवाण घेवाण करण्याचे जे अधिकार संघांकडे असतात, त्यानुसार गुजरात कडून मुंबईने विकत घेतलं आहे. रविवारी उशिरा या बातमीवर दोन्ही संघांनी शिक्कामोर्तब केलं. आणि हार्दिकवरून सुरू असलेला गोंधळ संपला. (IPL 2024 )
(हेही वाचा :IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, भारताची २ – ० ने आघाडी)
दहाही संघांनी रविवारी जाहीर केलेली यादी आणि त्यानंतर खेळाडूंच्या देवाण घेवाणीचे झालेले करार संपल्यानंतर कुठले खेळाडू संघांनी आपल्याकडे कायम राखले आणि कुठल्या खेळाडूंना मुक्त केलं याची यादी आता बघूया. जे खेळाडू मुक्त झाले आहेत, त्यांचा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत पार पडणार आहे.
मुंबई इंडियन्स
कायम राखलेले खेळाडू : रोहीत शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सुर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्ही, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅमेरुन ग्रीन (बंगळुरुकडे विकला), शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमरा, कुमार कार्तिकेया, पियुष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहेरेनडॉर्फ, रोमारिओ शेफर्ड
मुक्त केलेले खेळाडू : अर्शद खान, रमणदीप सिंग, ह्रतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, दुआन जेन्सन, जाय रिचर्डसन, रिली मेरिडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर
गुजरात टायटन्स
कायम राखलेले खेळाडू : हार्दिक पांड्या (नंतर मुंबईला विकला), डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, विजय शंकर, दर्शन नलकांडे, जयंत यादव, राहुल टेवाटिया, महम्मद शामी, नूर अहमद, साई किशोर, रशिद खान, जोश लिटिल, मोहीत शर्मा
मुक्त केलेले खेळाडू : यश दयाल, के एस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अलझारी जोसेफ, दासुन शंनाका
लखनौ सुपरजायंट्स
कायम राखलेले खेळाडू : के एल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पुरन, आयुष बदोनी, दीपक हुडा, के गौतम, कृणाल पांड्या, कायल मायर्स, मार्कस स्टॉयनिस, प्रेरक मंकड, युधवीर सिंग, मार्क वूड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अमित मिश्रा, नवीन उल हक
मुक्त केलेले खेळाडू : डॅनियल सॅम्स, कुणाल नायर, जयदेव उनाडकट, मानन वोरा, करन शर्मा, सुर्यांश शेडगे, स्वप्निल सिंग, अर्पित गुरेरिया
सनरायजर्स हैद्राबाद
कायम राखलेले खेळाडू : अब्दुल समाद, एडन मार्कक्रम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप्स, हेनरिच क्लासेन, मयंक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, नितिश रेड्डी, शाहबाझ अहमद, अभिषेक शर्मा, मार्को जेनसन, वॉशिंग्टन सुंदर, सनविर सिंग, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकांडे, उमरान मलिक, टी नटराजन, फझाहक फारुकी
मुक्त केलेले खेळाडू : हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील हुसैन, आदील रशिद
कोलकाता नाईटरायडर्स
कायम राखलेले खेळाडू : नितिश राणा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, रहमतुल्ला गुरबाझ, सुनीर नरेन, जेसन रॉय, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्शित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
मुक्त केलेले खेळाडू : शकीब अल हसन, लिट्टन दास, डेव्हिड वाईस, आर्य देसाई, एन जगदिशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साईदी, जॉन्सन चार्ल्स
चेन्नई सुपरकिंग्स
कायम राखलेले खेळाडू : महेंद्रसिंग धोणी, मोईन अली, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवन दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जाडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना, अजिंक्य रहाणे, शैक रशिद, मिचेल सँटर, सिमरनजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महिष थिक्शाना
मुक्त केलेले खेळाडू : बेन स्टोक्स, ड्वेन प्रेटोरिअस, अंबाती रायडू, सिसांदा मंगला, कायल जेमिसन, भगथ वर्मा, सेनापती, आकाश सिंग
दिल्ली कॅपिटल्स
कायम राखलेले खेळाडू : रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ॲनरिच नॉरये, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, अभिषेक पोरेल, ललित यादव, यश धुल, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, खलिल अहमद
मुक्त केलेले खेळाडू : मनिष पांडे, सर्फराज खान, रिली रसॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, अमान खान, प्रियम गर्ग, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रेहमान, फिल सॉल्ट, कमलेश नागरकोट्टी
राजस्थान रॉयल्स
कायम राखलेले खेळाडू : संजू सॅमसन, रवीचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, प्रसिध कृष्णन, नवदीप सैनी, अवेश खान, यशस्वी जयसवाल, कुलदीप सेन, संदीप शर्मा, पियान पराग, ध्रुव जुरेल, कुणाल सिंग, जोस बटलर, ट्रेंट बोल्ट, ॲडम झँपा, शिमरॉन हेटमेयर, डोनोवन फेरेरा
मुक्त केलेले खेळाडू : देवदत्त पडिकल, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम असिफ, आकाश वशिष्ठ, अब्दुल बझिथ, कुलदीप यादव, जो रुट, जेसल होल्डर, ओबेद मॅकॉय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कायम राखलेले खेळाडू : फाफ द्लू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरार, कर्ण शर्मा, मनोज भनदागे, मयंक दागर, विजयकुमार, आकाश दीप, महम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांशू शर्मा, राजेंद्र कुमार
मुक्त केलेले खेळाडू : वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव
पंजाब किंग्स
कायम राखलेले खेळाडू : शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लिअम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, रिषी धवन, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, गुरनूर ब्रार, विद्धत कवेरप्पा
मुक्त केलेले खेळाडू : भानुका राजपक्षा, मोहीत राठी, बलतेज धांदा, राज अंगद बावा, शाहरुख खान
(हेही पहा –
Join Our WhatsApp Community