IPL 2024 : रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार 

IPL 2024 : दुखापतीतून कमबॅक करणारा रिषभ पंत दिल्ली संघाचं नेतृत्वही करणार आहे 

149
IPL 2024 : रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार 
IPL 2024 : रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार 
  • ऋजुता लुकतुके

रस्ते अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेला रिषभ पंत (Rishabh Pant) नवीन हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचं नेतृत्व करणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये दिल्लीजवळ यमुना एक्सप्रेस हायवेवर झालेल्या रस्ते अपघातानंतर रिषभ १४ महिने क्रिकेटपासून दूर आहे. या अपघातात जीवावर बेतलं असताना रिषभ सुदैवाने वाचला. आणि त्यानंतर काही शस्त्रक्रियांनंतर त्याने आपल्या तंदुरुस्तीवर अजोड मेहनत घेऊन त्याने क्रिकेटमध्ये सुरुवातीला अशक्य वाटणारं पुनरागमन केलं आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- Mazgaon Tadwadi BIT Chawl : माझगाव ताडवाडीचा पुनर्विकास होणार नव्याने)

‘रिषभ पंतचं कर्णधार म्हणून आम्ही स्वागत करतो. हिंमत आणि बेडर क्रिकेट खेळणं ही त्याची ओळख आहे. आणि तीच वृत्ती दुखापतीशी दोन हात करतानाही त्याने दाखवून दिली आहे. संघ नवीन हंगामाला सामोरं जात असताना रिषभ (Rishabh Pant) संघात परतला आहे. आता त्याला प्रत्यक्ष मैदानात बघण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असं संघाचे सहमालक पार्थ जिंदाल मीडियासाठी काढलेल्या पत्रकात म्हणाले आहेत. (IPL 2024)

दिल्ली संघाने आपलं हंगामापूर्वीचं सराव शिबीर विशाखापट्टणम इथं घेतलं. त्यात रिषभ सहभागी झाला होता. संघाचा पहिला सामना २३ मार्चला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. २२ मार्चला आयपीएलला सुरुवात होत आहे. (IPL 2024)

(हेही वाचा- Wrestling Crisis : साक्षी मलिक, विनेश यांचं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडं)

जीवघेण्या अपघातानंतर मागचं वर्षभर रिषभ (Rishabh Pant) बीसीसीआयच्या बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीवर मेहनत घेत होता. काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय पथकाने त्याला आयपीएल खेळायला आणि २० षटकं यष्टीरक्षण करायला परवानगी दिली आहे. सरावाच्या काळात रिषभच्या खेळात कसलंही अवघडलेपण नसल्याचं संघ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. तर प्रशिक्षक रिकी पाँटिंगही रिषभच्या परतण्यामुळे खुश आहेत. (IPL 2024)

‘रिषभ मैदानात असेल तर संघात ऊर्जा संचारते. तो संघात चैतन्य आणतो. सदैव हसरा चेहरा खेळाडूंसाठी दिलासादायक असतो. त्यामुळे गेल्यावर्षी त्याची उणीव संघाला जाणवली. आता नवीन हंगामात रिषभ संघात आल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे,’ या शब्दांत मुख्य प्रशिक्षक पाँटिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (IPL 2024)

(हेही वाचा- Billiards Hall of Fame : पंकज अडवाणीचा बिलियर्ड्सच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश)

गेल्यावर्षी रिषभच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने (David Warner) दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं. पण, संघ दहा संघांमध्ये नवव्या स्थानावर राहिला होता. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला गेल्या हंगामात फक्त ५ सामने जिंकता आले. तर ९ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.(IPL 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.