ऋजुता लुकतुके
भारताचा यष्टीरक्षक (IPL 2024) डावखुरा फलंदाज रिषभ पंत गंभीर रस्ते अपघातामुळे झालेल्या दुखापतीतून आता सावरलाय. आयपीएल २०२४ मध्ये तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून तो खेळाडूंच्या लिलावातही सहभागी झाला आहे.
लिलावात सहभागी होण्याविषयी रिषभ पंत उत्सुक होता. लिलावाच्या एक दिवस आधी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. यात बोलताना रिषभने नवीन भूमिकेविषयी त्याच्या (IPL 2024) भावनाही व्यक्त केल्या. ‘मी आधी कधीही खेळाडूंच्या लिलावात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन आहे. त्यासाठी मी उत्सुक आहे. एकूणच नवीन हंगाम माझ्यासाठीही अनेक अर्थांनी नवीन आहे. त्याची मी वाट बघतोय,’ असं रिषभ म्हणाला.
HERE. WE. GO 🔥
Smile is 🔙, Audacity is 🔙, Look who’s 🔙 💙#YehHaiNayiDilli #RishabhPant #IPLAuction | @RishabhPant17 pic.twitter.com/xVLqvlXI8G
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 18, 2023
दुखापतीपूर्वी रिषभ पंत भारतीय संघातील आणि या लीगमधील एक महत्त्वाचा खेळाडू होता. २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या पंतने आयपीएलमध्ये ९८ सामन्यांत २,८३८ धावा जमा केल्या होत्या. २०२१ मध्ये यमुना एक्सप्रेस हायवे जवळ झालेल्या रस्ते अपघातामुळे पंतच्या कारकीर्दीला लगाम लागला. पुढची दोन वर्षं तो बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत आहे.
मधल्या काळात जागतिक कसोटी अजिंक्यपद, एकदिवसीय विश्वचषक आणि गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये तो खेळू शकलेला नाही. पण, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने अपेक्षेपेक्षा खूपच लवकर मैदानात पुनरागमन केलं आहे. आणि आता नवीन हंगामात तो मैदानावर आपलं नशीब आजमावणार आहे. शिवाय दिल्ली संघाचं नेतृत्वही करणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community