- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामात रिषभ पंत (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार हे आता जवळ जवळ नक्की झालं आहे. त्यासाठी आवश्यक चाचणीचा अडथळा त्याने पार केला असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून रिषभ बंगळुरूमध्ये आहे. आणि तिथे तो तंदुरुस्तीवर मेहनत घेत आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेनं बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीतील सूत्रांच्या हवाल्याने रिषभ पंतच्या तंदुरुस्तीची बातमी दिली आहे. (IPL 2024)
डिसेंबर २०२२ मध्ये पंत शेवटची स्पर्धात्मक मालिका बांगलादेश विरुद्ध खेळला होता. पण, ही मालिका संपल्यानंतर काही दिवसांत जमुना एक्सप्रेस महामार्गावर एका रस्ते अपघातात रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता. सुरुवातीला रिषभ पंतला (Rishabh Pant) डेहराडून इथं मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ४ जानेवारीला पंतला तातडीने हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला हलवण्यात आलं. आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुंबईत त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर दिनशॉ पारडीवाला यांनी शस्त्रक्रिया केली होती. पारडीवाला हे आयसीसीच्या पॅनलवर असलेले शल्यविशारद आहेत. (IPL 2024)
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : बजरंग पुनिया, रवी दाहिया ऑलिम्पिक शर्यतीतून बाहेर)
या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर एप्रिल २०२३ पासून पंत (Rishabh Pant) बंगळुरूत क्रिकेट अकादमीत आहे. तिथे तो सामना खेळण्याइतका तंदुरुस्त व्हावा आणि दुखापतीतून सावरावा यासाठी बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाबरोबर त्याने काम केलं आहे. आता क्रिकेट अकादमीतील पथकाने पंतला तंदुरुस्तीचं प्रमाणपत्रही दिलं आहे. आयपीएल खेळण्याच्या दृष्टीने अलीकडेच बंगळुरूमध्ये स्थानिक स्तरावर क्रिकेट खेळायलाही सुरुवात केली होती. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community