- ऋजुता लुकतुके
रोहित शर्माचा (Rohit Sharma) कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफमधील मित्र अभिषेक नायरशी झालेला संवाद व्हायरल झाल्यानंतर चर्चा काही थांबत नाहीए. शुक्रवारी मुंबई इंडियन्स संघ या हंगामातील शेवटचा सामना खेळला. आता सोशल मीडियावर नव्याने चर्चा होतेय की, रोहितचा मुंबई पलटनबरोबरचा हा शेवटचा सामना होता का? त्यातच मुंबई संघातील त्याच्या सहकाऱ्याची एक पोस्टही सगळीकडे फिरत आहे. (IPL 2024 Rohit Sharma)
अभिषेक बरोबरच्या त्या व्हिडिओत रोहित (Rohit Sharma) म्हणतो, ‘भाई, माझं काय? माझं तर हे शेवटचं आहे!’ तिथून चर्चांना सुरुवात झाली. यंदा मुंबई फ्रँचाईजीने अचानक हंगामाच्या सुरुवातीला रोहितला कप्तानीवरून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातकडून मुंबईत आलेल्या हार्दिककडे कप्तानी सोपवली. रोहित त्यामुळे नाराज आहे का, यावर मग उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. (IPL 2024 Rohit Sharma)
(हेही वाचा – ऐन निवडणुकीत Sanjay Raut यांच्या अडचणींत वाढ; गुन्हा दाखल)
आता लखनौ बरोबरचा सामना संपल्यानंतर मुंबई क्रिकेटचा एक शिलेदार वसिम जाफरची पोस्ट व्हायरल होते आहे. वसिम १९९६ ते २०१५ दरम्यान मुंबई क्रिकेट जवळून पाहिलेला क्रिकेटपटू आहे आणि रोहितचा उदय ते भारतीय संघाबरोबरचा प्रवास त्याने जवळून पाहिला आहे. (IPL 2024 Rohit Sharma)
Have a feeling this is the last time we are seeing Rohit in Mumbai Indians jersey. #MIvLSG #IPL2024 pic.twitter.com/xe246SI3Es
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 17, 2024
‘मला असं वाटतंय की, रोहितला (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सच्या जर्सीत आपण शेवटचं पाहतोय,’ असं वसिम जाफरने सामन्यानंतर म्हटलं आहे. लखनौ विरुद्ध रोहित ३८ चेंडूंत ६८ धावांची एक सुरेख खेळी खेळला. यात त्याने ५ षटकारही लगावले. मुंबई इंडियन्ससाठीही त्याने चांगली कामगिरी करताना संघाला ५ विजेतेपदं मिळवून दिली आहेत. (IPL 2024 Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community