- ऋजुता लुकतुके
या हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघ (mumbai indians) प्रशासनाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला, तो म्हणजे संघाला ५ आयपीएल विजेतेपदं मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्याचा. आणि या निर्णयानंतर मुंबई संघाला सलग तीन सामने गमवावे लागले आहेत. पहिल्या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स संघाने त्यांचा ६ धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादकडून संघाला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. (IPL 2024, Rohit Sharma)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : निवडणुकांच्या रंगात रंगले अवघे विदर्भ; बड्या नेत्यांची रेलचेल)
पण, या दोन्ही सामन्यांत रोहित शर्माची कामगिरी चांगली होती. पहिल्या सामन्यांत २९ चेंडूंत ४३ धावा केल्या. तर हैद्राबाद विरुद्ध त्याच्या धावा होत्या १३ चेंडूंत २२. यानंतर मुंबईचा आपले पुढील चार सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर (wankhede stadium) खेळत आहे. आणि यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्यांचा पराभवही झाला आहे. (IPL 2024, Rohit Sharma)
या सामन्यासाठी रोहित शर्मा सोमवारी आपल्या रेंजरोव्हर गाडीने स्टेडिअमवर आला. तेव्हा सगळ्यांचं लक्ष गेलं ते गाडीच्या नंबर प्लेटवर. (IPL 2024, Rohit Sharma)
Hitman Rohit Sharma driving his latest Range Rover 🔥
We don’t want 200 here @ImRo45 😅 pic.twitter.com/GRKjqoKoMf
— Nisha (@NishaRo45_) March 31, 2024
(हेही वाचा- Benjamin Netanyahu: इस्रायलमध्ये दहशतवादी वाहिनीच्या प्रसारणावर बंदी, पंतप्रधान नेत्यनाहू यांचे आदेश)
रोहितची नवीन रेंजरोव्हर कार ही काळ्या रॉयल रंगाची आहे. आणि तिची नंबर प्लेट आहे एमएच०१ – ई०० २६४. रोहितच्या क्रिकेट कारकीर्दीत २६४ या आकड्याचं विशेष महत्त्व आहे. ती त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने नाबाद २६४ धावा केल्या होत्या. (IPL 2024, Rohit Sharma)
त्या सामन्यांत रोहितने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पिसं काढत ३३ चौकार आणि ९ षटकार खेचले होते. आणि या खेळीनंतर एकदिवसीय संघातील आपली जागाही भक्कम केली होती. तोच क्रमांक त्याच्या नवीन रेंजरोव्हर गाडीवर सोमवारी दिसला. (IPL 2024, Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community