IPL 2024, RR bt DC : वेदनाशामक गोळ्या खाऊन खेळला पण, ठरला ‘मॅचविनर’

रियान पराग दुखापतीमुळे तीन दिवस अंथरुणावरूनही उठला नव्हता.

180
IPL 2024, RR bt DC : वेदनाशामक गोळ्या खाऊन खेळला पण, ठरला ‘मॅचविनर’
IPL 2024, RR bt DC : वेदनाशामक गोळ्या खाऊन खेळला पण, ठरला ‘मॅचविनर’
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या नवव्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागच्या नाबाद 84 धावांच्या खेळीनं विजयाचा पाया रचला गेला.या विजयासह राजस्थाननं गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. रियान परागला (Riyan Parag) त्याच्या नाबाद खेळीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. रियान परागनं (Riyan Parag) दिल्ली विरुद्धच्या मॅचपूर्वी तीन दिवस काय केलं हे सांगितलं आहे. रियानं म्हटलंय की, मी कठोर मेहनत केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेडवर होतो.मी वेदनाशामक गोळ्या खात होतो, मी आज बेडवरुन उठलो असून कामगिरीबाबत खूश आहे, असं रियान पराग (Riyan Parag) म्हणाला.

रियान परागनं (Riyan Parag) दिल्ली कॅपिटल्स विरोधात यापूर्वी देखील 49 धावांची खेळी केली होती. दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानची 3 बाद 36 धावा अशी बिकट स्थिती झाली होती. रियान परागनं (Riyan Parag) सुरुवातीला आर. अश्विन आणि त्यानंतर ध्रुव जुरेल आणि हेटमायरसोबत राजस्थानची धावसंख्या 5 बाद 185 पर्यंत पोहोचवली होती. यंदाच्या हंगामात आक्रमकपणे सुरुवात करणाऱ्या रियागसाठी यापूर्वीची आयपीएल फारशी समाधानकारक नव्हती. दिल्ली विरुद्ध त्यानं त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी केली. रियान पराग (Riyan Parag) म्हणाला की, माझ्या आईनं गेल्या तीन ते चार वर्ष माझा संघर्ष पाहिला आहे. माझं माझ्याबद्दलचं मत स्पष्ट आहे. मला काही मिळो अथवा न मिळो, असं रियान पराग (Riyan Parag) म्हणाला.

राजस्थान रॉयल्सनं यापूर्वीच्या हंगामात रियान परागला लोअर ऑर्डरला बॅटिंगसाठी ठेवलं होतं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत रियान परागला (Riyan Parag) बॅटिंगसाठी वरच्या क्रमांकावर पाठवण्यात येत आहे . याचा फायदा राजस्थानच्या संघाला झाल्याचं दिसून येत आहे.

(हेही वाचा – PM Modi On Aai To AI : भारतातील मुलांचा ‘आई’ ते ‘AI’प्रवास; जाणून घ्या काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?)

राजस्थानचा कॅप्टन संजू सैमसन (Sanju Samson) रियान परागच्या कामगिरीवर खूश आहे. संजू सैमसननं रियान परागचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. रियान परागबद्दल जिथं जाईन तिथं लोक विचारत असतात. रियान पराग भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचं योगदान देऊ शकतो, असं संजू सॅमसन म्हणाला.

रियान परागनं (Riyan Parag) राजस्थानची स्थिती 3 बाद 36 धावा अशी झाल्यानंतर अश्विन, ध्रुव जुरेल आणि हेटमायर यांच्यासोबत डाव सावरला.अश्विन आणि पराग यांनी 54 धावांची भागिदारी केली. यानंतर रियाननं जुरेल याच्यासोबत भागिदारी करुन राजस्थानचा डाव सावरला. रियान परागनं त्याच्या 45 बॉलमधील 84 धावांच्या खेळीत 7 फोर आणि 6 सिक्सर मारले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.