IPL 2024 RR vs LSG : संजू सॅमसनच्या कप्तानी खेळीमुळे राजस्थानचा लखनौवर विजय

IPL 2024, RR vs LSG : संजू सॅमसनने ५२ चेंडूंत नाबाद ८२ धावा केल्या. 

130
IPL 2024 RR vs LSG : संजू सॅमसनच्या कप्तानी खेळीमुळे राजस्थानचा लखनौवर विजय
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या पहिल्या वीक एंडला आतापर्यंत फक्त चारच सामने झाले आहेत. पण, चेन्नई सुपरकिंग्जचा अपवाद वगळता पाहुण्या संघानेच त्यात विजय मिळवला आहे. पण, रविवारी चेन्नईच्या पंक्तीत राजस्थान रॉयल्सचा संघ पोहोचला आहे. जयपूरच्या घरच्या मैदानावर त्यांनी लखनौ सुपरजायंट्स संघाचा अगदी आरामात २० धावांनी पराभव केला. फरक २० धावांचा दिसतोय तो लखनैच्या निकोलस पुरनने सहाव्या क्रमांकावर फटकेबाजी करत हे अंतर कमी केल्यामुळे. अन्यथा, राजस्थान रॉयल्सनी हा सामना आरामात जिंकला, असंच म्हणावं लागेल. (IPL 2024 RR vs LSG)

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली. आणि त्यानंतर संघासाठी काहीही चुकीचं घडलं नाही. जोस बटलर (११) झटपट बाद झाला. पण, त्यामुळे संजू सॅमसन मैदानात आला. आणि त्याने घणाघाती फलंदाजी करत सामन्यावर वर्चस्व मिळवलं. यशस्वी २४ धावा करून बाद झाल्यावर रायन पराग आणि सॅमसनने तर ९३ धावांची भागिदारी रचली. आणि त्यामुळेच राजस्थानचा संघ ४ बाद १९४ अशी धावसंख्या रचू शकला. (IPL 2024 RR vs LSG)

(हेही वाचा – Prakash Ambedkar नसतील तरी निवडणूक जिंकू : Sanjay Raut)

संजू सॅमसनच्या ५२ धावांच्या खेळीत चौकारांपेक्षा षटकारच जास्त होते. त्याने ३ चौकार आणि ६ षटकार ठोकले. रायन परागनेही ३ षटकार खेचले. संजूने आपलं अर्धशतक पूर्ण केलं हो ही षटकार मारतच. (IPL 2024 RR vs LSG)

लखनौच्या संघाचीही सुरुवात चांगली होती. आणि कर्णधार के एल राहुलने एका महिन्यानंतर मैदानावर परतताना ५८ धवा करत चांगली सुरुवात करुन दिली. पण, दुसऱ्या बाजूने गडी बाद होत गेले. देवदत्त पड्डिकल, आयुष बदोनी आणि दीपक हुडा झटपट बाद झाले. त्याने दहाव्या षटकानंतर लखनौची अवस्था ४ बाद ७४ अशी दयनीय होती. पण, त्यानंतर वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरनने खेळाची सूत्र आपल्या हातात घेत ४१ चेंडूंत ६४ धावा केल्या. तो नाबादही राहिला. पण, पुरेशी साथ न मिळाल्यामुळे लखनौचा पराभव अटळ होता. राजस्थानसाठी ट्रेंट बोल्टने दोन गडी बाद केले. राजस्थान रॉयल्सला विजयाचे २ गुण मिळाले. तर संजू सॅमसनने पहिल्या वीक एंडला ऑरेंज कॅपचाही मान मिळवला. (IPL 2024 RR vs LSG)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.