- ऋजुता लुकतुके
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL 2024, RR Vs RCB) यांच्यातील सामना ही रॉयल लढत म्हणून ओळखली जाते. आणि मैदानातील स्पर्धेच्या बाबतीत ती खरंच रॉयल ठरली. रॉयल म्हणजे राजेशाही. पण, राजस्थानने खडूस आणि काटकसरीने धावा वाचवत आणि जमवत हा सामना जिंकला. नाणेफेक जिंकून त्यांनी बंगळुरला पहिली फलंदाजी दिली. फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी ३७ धावांची सलामी दिली खरी. पण ट्रेंट बोल्टला कसं खेळायचं दोघांना समजत नव्हतं. ट्रेंटने पहिल्या दोन षटकांत फक्त ३ धावा दिल्या होत्या. त्यानेच मग फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) १७ धावांवर बादही केलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी चहल आणि अश्विन असा फिरकी मारा सुरू झाला. त्यात विराट बेमालूम अडकला. चहलचा चेंडू त्याने षटकारासाठी टोलवला. पण, आवश्यक उंची तो देऊ शकला नाही. सीमारेषेवर बदली फरेराने झेल पकडला. विराट ३३ धावा करून बाद झाला. (IPL 2024, RR Vs RCB)
(हेही वाचा- Crime News: २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, आणि…)
पहिले दोन बळी ५६ धावांत गेल्यावर राजस्थान गोलंदाजांनी पाश आवळले होते. धावा वेगाने निघत नव्हत्या. गोलंदाजांची ही कंजुषी बंगळुरूच्या फलंदाजांचं दडपण वाढवत होती. ग्रीनने २७ आणि पाटिदारने ३४ धावा केल्या. पण, मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मधल्या फळीचं अपयश बंगळुरूसाठी नुकसानदायी ठरलं. शेवटी महिपाल लोमरोवने ३२ धावा करत निदान बंगळुरूला ८ बाद १७३ धावांपर्यंत पोहोचवलं. (IPL 2024, RR Vs RCB)
Chennai Calling ✈️
Congratulations to 𝗥𝗮𝗷𝗮𝘀𝘁𝗵𝗮𝗻 𝗥𝗼𝘆𝗮𝗹𝘀 🥳🩷
They are set to face Sunrisers Hyderabad in an electrifying #Qualifier2 🤜🤛
Scorecard ▶️ https://t.co/b5YGTn7pOL #TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall | @rajasthanroyals pic.twitter.com/V8dLUL0hSS
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
या धावसंख्येला उत्तर देताना राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयसवालला (Shasvi Jaiswala) सूर गवसला. त्याने ३० धावांत ४५ धावा करून राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली होती. पण, यशस्वी स्वत: आणि टॉम कोहलर (२०) तसंच संजू सॅमसन १७ लागोपाठ बाद झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. त्यातच ध्रुव जुरेलला विराट कोहलीने अविश्वसनीयरित्या धावचीत केलं. या बळीनंतर तर प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला. पण, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर यांनी मोक्याच्या क्षणी ४५ धावांची भागिदारी करत राजस्थानला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणलं. पण, सामना एवढ्यात संपणार नव्हता. सिराजने एकाच षटकात रियान आणि हेटमायरला बाद केलं. (IPL 2024, RR Vs RCB)
(हेही वाचा- SDRF पथकाची बोट उलटली, पथकातील तिघांचा मृत्यू!)
आता धावगतीही षटकामागे ६ इतकीच होती. पण, रोवमन पॉवेलने ८ चेंडूंत १६ धावा करत राजस्थानला विजय मिळवून दिला. ४ गडी आणि ६ चेंडू राखून राजस्थानचा विजय झाला. बंगळुरूचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. आणि राजस्थानने दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्रता मिळवली आहे. ही लढत शुक्रवारी चेन्नईत होणार आहे. सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगेल. (IPL 2024, RR Vs RCB)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community