- ऋजुता लुकतुके
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने शानदार अर्धशतक ठोकलं. या खेळीदरम्यान वेंकटेश अय्यरच्या एका षटकात त्याने तब्बल २८ धावा वसूल केल्या. त्याचा ‘नो लूक’ षटकार विशेष लक्षात राहील असा होता. पण, दिल्ली संघाचा पराभव काही तो टाळू शकला नाही. २७७ धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाला तब्बल १०६ धावा कमी पडल्या. (IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant)
(हेही वाचा- Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाने घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा, नोंदवली निरीक्षणे; जाणून घ्या…)
रिषभ पंत (५५) आणि ट्रिस्टन स्टब्ज (५४) यांचा अपवाद वगळला तर दिल्लीचे इतर फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. या दोघांनी ९३ धावांची भागिदारीही केली. दिल्लीच्या डावातील १२ वं षटक रिषभ पंतच्या हल्ल्यामुळे लक्षात राहील. वेंकटेश अय्यरच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने ४, ६, ६, ४, ४, ४ अशा एकूण २८ धावा वसूल केल्या. दुसरा षटकार मारताना पंतने डीप फाईन लेगला चेंडू भिरकावून दिला. हा फटका मारताना पंतची चेंडूवर नजरही नव्हती. पण, फटका इतका जोरकस होता की, तो थेट सीमारेषे पलीकडे गेला. (IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant)
खासकरून या षटकाराचं कौतुक प्रतिस्पर्धा संघ कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मालक शाहरुख खानलाही वाटलं. त्याने उभं राहून पंतला मानवंदना दिली. तर सामन्यानंतरही खास भेटून अभिनंदन केलं. (IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant)
(हेही वाचा- mahalakshmi mandir kolhapur : अंबाबाई देवीच्या मूर्तीची झीज; अहवालातून धक्कादायक माहिती उघड)
Rishabh Pant says hello to selectors with no look shot.
Shah Rukh Khan is in the opposition but he also can’t stop himself from praising.
Pant is the big big positive after Rinku Singh from this match. World Cricket,We are coming to claim the ICC trophypic.twitter.com/5SEDD8GXg9
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) April 3, 2024
कोलकाता संघाचा (KKR) सामना संपला की, शाहरुख खान नियमितपणे मैदानात उतरून खेळाडूंना भेटतो. यावेळी कोलकाता संघाचं कौतुक त्याने केलंच. शिवाय मोठ्या दुखापतीनंतर पुनरागमन करत शिवाय मनसोक्त फलंदाजी करणाऱ्या पंतचं कौतुक करायला तो विसरला नाही. (IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant)
From SRK with love 🤗 ☺️
Signing off from Vizag 🫡#TATAIPL | #DCvKKR | @DelhiCapitals | @KKRiders | @iamsrk pic.twitter.com/XL7HuIEPyL
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024
शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ सध्या ३ पैकी ३ सामने जिंकून गुण तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. पण, रिषभ पंत मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतोय. आणि त्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेतही यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे. (IPL 2024, Shahrukh Khan Praises Rishabh Pant)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community