- ऋजुता लुकतुके
भारताचा युवा स्टार फलंदाज शुभमन गिल (IPL 2024, Shubman Gill) बुधवारी आपला १००वा आयपीएल सामना खेळला. आणि त्याचबरोबर तो वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) या भारतीय सलामीवीरांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Delhi Capitals vs Gujarat Titans) या सामन्याच्या नाणेफेकीसाठी कर्णधार म्हणून तो मैदानात उतरला तेव्हाच त्याच्या नावावर हा विक्रम जमा झाला. त्याच्या संघाला या सामन्यात ४ धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. खुद्द गिलही ६ धावांवर बाद झाला. पण, शुभमनसाठी हा सामना मैलाचा दगड ठरला. (IPL 2024, Shubman Gill)
१०० किंवा त्याहून जास्त आयपीएल सामने खेळणाऱ्या विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), गौतम गंभीर (Gautam Gambhir), स्टिव्ह स्मिथ, इरफान पठाण, ब्रँडम मॅक्युलम आणि लसिथ मलिंगा या खेळाडूंच्या पंक्तीत शुभमन जाऊन बसला आहे. महेंद्र सिंग धोनी २५३ सामन्यांसह या यादीत सगळ्यात वर आहे. धोनीने आयपीएलमध्ये ५,१७३ धावाही केल्या आहेत. (IPL 2024, Shubman Gill)
#TitansFAM, it’s the 💯th #TATAIPL match for our Captain Gill! 🤩
Best wishes, #AavaDe! ⤵️ https://t.co/DIW2WqxgDH
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 24, 2024
आपला शंभरावा सामना खेळणाऱ्या शुभमनने नाणेफेकीच्या वेळी मीडियाशी संवादही साधला. ‘१०० सामन्यांचा टप्पा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. बराच पल्ला गाठला असला तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे,’ असं शुभमन यावेळी म्हणाला. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही लगेच त्याची मुलाखत झळकली. आपला शंभरावा सामना शुभमन आणखी संस्मरणीय कऱणार का, असा मथळा या व्हीडिओला देण्यात आला होता. (IPL 2024, Shubman Gill)
A century of IPL matches for Captain Shubman Gill 😎
He sets foot in his 1️⃣0️⃣0️⃣th IPL match 👏👏
Can he make it even more special? 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/48M4ajbLuk#TATAIPL | #DCvGT | @ShubmanGill pic.twitter.com/F6fiOAAXTz
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2024
(हेही वाचा- T20 World Cup 2024 : अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा ब्रँड अँबेसिडर युसेन बोल्ट)
शुभमनने १०० आयपीएल सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ३,०९४ धावा केल्या आहेत. पण, दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तो ६ धावा करून बाद झाला. आणि विजयासाठी २२५ धावांचं आव्हान असताना त्याचा संघ चांगली लढत देत २२० धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे संघाचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. (IPL 2024, Shubman Gill)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community