- ऋजुता लुकतुके
शुभमन गिलने (Shubman Gill) बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध ४४ चेंडूंत ७२ धावा करताना आयपीएलमधील ३,००० धावांचा टप्पाही पार केला. आणि ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान क्रिकेटपटू ठरलाय. शुभमनच्या टी-२० क्रिकेटमध्ये ४,००० धावाही पूर्ण झाल्या आहेत. आणि ही कामगिरी त्याने केलीय २४ वर्षं आणि २१५ दिवसांत. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने २६ वर्षं आणि १८६ दिवसांत ही कामगिरी केली होती. (IPL 2024 Shubman Gill)
संजू सॅमसन (२६ वर्षं ३२० दिवस) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर या तिघांच्या पाठोपाठ सुरेश रैना (२७ वर्ष १६१ दिवस), रोहित शर्मा (२७ वर्ष ३४३ दिवस) यांचा क्रमांक लागतो. शुभमन गिल (Shubman Gill) मागची दोन वर्ष भारतीय संघातही सलामीवीर आणि आघाडीचा फलंदाज म्हणून सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. आणि आता गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळताना यंदाच्या आयपीएलमध्ये त्याची बॅटही तळपतेय. (IPL 2024 Shubman Gill)
3⃣0⃣0⃣0⃣ runs in #TATAIPL for Shubman Gill 🙌
Another milestone for the @gujarat_titans Captain 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/1HcL9A97Ch#RRvGT pic.twitter.com/sNLsCH0RtW
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
लहान वयात प्रगल्भ फलंदाजी करणारा क्रिकेटपटू अशी दखल शुभमन गिलची (Shubman Gill) आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने घेतली आहे. सध्या त्याची कामगिरीही सातत्यपूर्ण आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ४,००० धावाही त्याने पूर्ण केल्या आहेत. (IPL 2024 Shubman Gill)
(हेही वाचा – IPL 2024 GT vs RR : आयपीएलमध्ये गुजरात, राजस्थान सामन्यात शेवटच्या चेंडूवर काय नाट्य घडलं?)
आयपीएलमध्ये जलद ३,००० धावा पूर्ण करणारे फलंदाज
- शुभमन गिल (२४ वर्ष २१५ दिवस)
- विराट कोहली (२६ वर्ष १८६ दिवस)
- संजू सॅमसन (२६ वर्ष ३२० दिवस)
- सुरेश रैना (२७ वर्ष १६१ दिवस)
- रोहित शर्मा (२७ वर्ष ३४३ दिवस)
𝐓𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐯𝐢𝐞𝐰𝐬 𝐚𝐫𝐞 𝐞𝐧𝐣𝐨𝐲𝐞𝐝 𝐢𝐧 𝟒𝐊 🤩@ShubmanGill | #AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024 | #RRvGT pic.twitter.com/B1d2E1nHUJ
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 10, 2024
टी-२० क्रिकेटमध्ये ४,००० धावा पूर्ण करण्यातही शुभमनचा (Shubman Gill) वेग अगदी डेव्हिड वॉर्नरपेक्षा जास्त आहे. तर आयपीएलच्या ३,००० धावा कमीत कमी डावांत पूर्ण करणाऱ्यांमध्ये शुभमन तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथं ख्रिस गेल सगळ्यांच्या खूप पुढे आहे. (IPL 2024 Shubman Gill)
किमान डावांत ३,००० आयपीएल धावा
- ख्रिस गेल (७५)
- के एल राहुल (८०)
- जोस बटलर (८५)
- शुभमन गिल (९४)
- डेव्हिड वॉर्नर (९४)
- फाफ दू प्लेसिस (९४)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community