- ऋजुता लुकतुके
या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैद्राबादने (IPL 2024, SRH vs LSG) कामगिरीत सातत्य नसेल दाखवलं. पण, त्यांनी अडीचशेच्या वर मजल तीनदा मारली आहे. मिळवलेले विजयही मोठे आहेत. आताही बाद फेरीचं दडपण वाढलेलं असताना त्यांनी लखनौ सुपरजायंट्स संघाचा १० गडी आणि ६२ चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे त्यांनी स्वत: बाद फेरीच्या शर्यतीत स्थान राखलं आहेच. शिवाय पाचवेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई संघाला त्यांनी स्पर्धेबाहेर फेकलंय. (IPL 2024, SRH vs LSG)
(हेही वाचा- Pakistan : पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याकडून १०० मुलांचे लैंगिक शोषण)
बुधवारी विजयासाठी १६५ धावांचं आव्हान ट्रेव्हिस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) या त्यांच्या सलामीच्या जोडीने ९.४ षटकांत पूर्ण केलं. यंदाचं वर्ष हैद्राबादसाठी विक्रमांचं ठरलं आहे. आयपीएलमधील सगळ्यात मोठी धावसंख्या रचण्याबरोबरच १० षटकांच्या आत १६७ धावा करण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. राखलेले गडी आणि चेंडू यांचा एकत्र विचार केला तर आयपीएलच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा विजय ठरला आहे. (IPL 2024, SRH vs LSG)
WHAT. A. CHASE 🧡
A 🔟-wicket win for @SunRisers with more than 🔟 overs to spare!
Scorecard ▶️ https://t.co/46Rn0QwHfi#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/kOxzoKUpXK
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
लखनौ संघाचा कर्णधार के एल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली खरी. पण, नाणेफेक सोडली तर काहीच त्यांच्या मनासारखं झालं नाही. कमिन्स (Cummins) आणि भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) गोलंदाजीपुढे त्यांचे ४ बळी ६० धावांतच गेले होते. त्यानंतर निकोलस पुरन आणि आयुष बदोनी यांनी ९९ धावांची भागिदारी करत लखनौला निदान दीडशेच्या पार नेलं. लखनौची फलंदाजी सुरू असताना संथ वाटणारी खेळपट्टी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ट्रेव्हिस हेड (Travis Head) यांची फलंदाजी सुरू असताना अचानक वेगळी भासायला लागली. त्यांचा धडाकाच तसा होता. (IPL 2024, SRH vs LSG)
For his stellar performance with the bat, Travis Head wins the Player of the Match award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/46Rn0QwHfi#TATAIPL | #SRHvLSG | @SunRisers pic.twitter.com/MCXUHtGxbn
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
(हेही वाचा- औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका Bombay High Court फेटाळली)
दोघांनी सहाव्या षटकातच संघाचं शतक फलकावर लावलं. दोघंही फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलत होते. कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gautam), रवी बिश्नोई (Ravi Bishnoi), यश ठाकूर (Yash Thakur), आयुष बदोनी (Ayush Badoni) आणि नवीन उल हक (Naveen-ul-Haq) या सगळ्यांचीच धुलाई झाली. हेड (Travis Head) आणि अभिषेक (Abhishek Sharma) यांनी चक्क १७.२७ धावांची धावगती ठेवत लक्ष्य पार केलं. हेडने ३० चेंडूंत ८९ धावा करताना ८ षटकार आणि ८ चौकार ठोकले. तर अभिषेकने २८ चेंडूंत ७५ धावा करताना ६ षटकार आणि ८ चौकार ठोकले. सनरायझर्स हैद्राबादने आता १४ गुणांसह गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर गतविजेत्या मुंबईला यंदा साखळीतच बाद होण्याची वेळ ओढवली आहे. (IPL 2024, SRH vs LSG)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community