- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा कर्णधार फाफ दू प्लेसिसने (Faf du Plessis) मागच्या पराभवाच्या वेळी म्हटलं होतं की, आम्ही नाणेफेक जिंकत नाही आहोत. त्यामुळे पहिली फलंदाजी करून कितीही धावा केल्या तरी त्या कमी पडतायत. तेव्हा संघ मुंबई विरुद्धचा सामना हरला होता. आणि संघाला १९६ धावाही कमी पडल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध दू प्लेसिसने नाणेफेक तर जिंकली. पण, त्यांनी ३ बाद २८७ धावांचा डोंगर उभा केला. आयपीएल मधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या. प्रयत्न करूनही बंगळुरूला ती पार करता आली नाही. त्यांना २५ धावा कमीच पडल्या. परिणामी, बंगळुरूच्या पदरी ७ सामन्यांतील ६ वा पराभव आला. उलट हैद्राबादचा संघ चौथा विजय मिळवून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला. (IPL 2024, SRH bt RCB)
(हेही वाचा- Lok Sabha election 2024 :लोकसभा निवडणुकीपूर्वी ४,६५० कोटींची विक्रमी जप्ती; ७५ वर्षांतील मोठी रक्कम)
बाकी प्रेक्षकांचं मात्र भरपूर मनोरंजन झालं. कारण, आयपीएलमध्ये एका सामन्यांत सर्वाधिक ५४९ धावा या सामन्यांत निघाल्या. ४४ षटकारांची आतषबाजी झाली. अनेक विक्रम मोडले. यजमान संघ हरला त्यामुळे प्रेक्षकांची थोडी निराशा झाली असणार. (IPL 2024, SRH bt RCB)
Match 30. Sunrisers Hyderabad Won by 25 Run(s) https://t.co/OOJP7G9JAZ #TATAIPL #IPL2024 #RCBvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024
(हेही वाचा- Loksabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले)
ट्रेव्हिस हेडचं (Travis Head) ३९ चेंडूतील शतक आणि बंगळुरूकडून ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) केलेल्या ३५ चेंडूंत ८३ धावा हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. पहिली फलंदाजी करताना हैद्राबादच्या सर्वच फलंदाजांनी किमान ३० धावा केल्या. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ट्रेव्हिस हेड (Travis Head) यांनी १०८ धावांची सलामी संघाला करून दिली. तर हेडने ४१ चेंडूत १०२ धावा करताना ८ षटकार आणि ९ चौकार ठोकले. त्यानंतर हेनरिक क्लासेननेही धुवाधार ६७ धावा केल्या. (IPL 2024, SRH bt RCB)
आधीच्या पराभवांसाठी नाणेफेकीला जबाबदार धरणारा दू प्लेसिस (Faf du Plessis) संघाच्या गोलंदाजीविषयी बोलायचं विसरला. ते अपयश या सामन्यातही पुन्हा एकदा उठून दिसलं. त्याने एकूण ६ गोलंदाज वापरले. पण, सगळ्यांनीच षटकामागे किमान १३ धावा दिल्या. याउलट हैद्राबादकडून सगळ्यांनी धावा लुटल्या असल्या तरी प्रत्येकाने किमान एक षटक चांगलं टाकलं, ज्याचा परिणाम बंगळुरूच्या धावसंख्येवर पडला. (IPL 2024, SRH bt RCB)
(हेही वाचा- One Nation, One Election लागू होणार ?; काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी)
विराट (Virat Kohli) आणि दू प्लेसिसने नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात संघाला करून दिली. पण, विराट ४२ धावांवर त्रिफळाचीत झाला. आणि त्यानंतर विल जॅक्स, रजत पाटिदार आणि सौरभ चौहान झटपट बाद झाले. या पडझडीमुळे बंगळुरूची फलंदाजी रुळावरून घसरली ती सावरण्याचा फक्त प्रयत्नच दिनेश कार्तिक करू शकला. त्याने ८३ धावा केल्या खऱ्या. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर बंगळुरूचा पराभव तो टाळू शकला नाही. या पराभवामुळे आता बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तळाला फेकला गेला आहे. संघाचं स्पर्धेतील आव्हान खडतर झालं आहे. (IPL 2024, SRH bt RCB)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community