IPL 2024, SRH VS RCB : ट्रेव्हिस हेडचं ३९ चेंडूंत घणाघाती शतक 

IPL 2024, SRH vs RCB : ट्रेव्हस हेडचं आयपीएलच्या इतिहासातील चौथ वेगवान शतक 

194
IPL 2024, SRH VS RCB : ट्रेव्हिस हेडचं ३९ चेंडूंत घणाघाती शतक 
IPL 2024, SRH VS RCB : ट्रेव्हिस हेडचं ३९ चेंडूंत घणाघाती शतक 
  • ऋजुता लुकतुके

सनरायझर्स हैद्राबादने (SRH) आतापर्यंत या हंगामात दोनदा २७० च्या वर धावा केल्या आहेत. या दोन्ही वेळा सलामीवीर ट्रेव्हिड हेडने (Trevid Head) त्यांना घणाघाती सलामी करून दिली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध धुवाधार ६३ धावा.  आता एक पाऊल पुढे जात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध त्याने ४१ चेंडूंत १०२ धावांची खेळी साकारली. ३९ चेंडूंत त्याने शतक पूर्ण केलं. सनरायझर्स हैद्राबादसाठी ते सगळ्यात वेगवान शतक ठरलं. तर आयपीएलच्या इतिहासातील चौथं वेगवान शतक. (IPL 2024, SRH vs RCB)

(हेही वाचा- Mercedes Benz GLC Coupe : मर्सिडिझ जीएलसीची कूप गाडी भारतात लाँच होण्याच्या तयारीत )

हेडचा धडाकाच असा होता की, हैद्राबादने ७ व्या षटकांतच शतक पूर्ण केलेलं होतं. तेराव्या षटकांत संघाच्या दीडशे धावा फलकावर लागल्या. (IPL 2024, SRH vs RCB)

हेडने या खेळीत ८ षटकार तर ९ चौकार ठोकले. जोरकस फटक्यांबरोबरच त्याचं टायमिंग आणि क्षेत्ररक्षकांमधून चेंडू काढण्याची हातोटीही उठून दिसली. शिवाय मैदानाच्या चारही बाजूंनी त्याने फटके लगावले. हे करताना हैद्राबादसाठी सगळ्यात वेगवान शतक झळकावण्याचा मानही त्याने पटकावला. (IPL 2024, SRH vs RCB)

(हेही वाचा- Ram Mandir Ayoddhya : रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साह; रामलल्लाचे दर्शन २० तास चालू रहाणार)

हेडचा धडाकाच असा होता की, प्रतिस्पर्धी संघातील विराट (Virat Kohli), दू प्लेसिस (Faf du Plessis) यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या माना पडलेल्या होत्या. त्याचं कसब त्याने दाखवून दिलंच. शिवाय घणाघाती फटके मारतानाची अचूकताही त्यातून दिसली. या शतकामुळे ट्रेव्हिस हेड वेगवान शतक झळकावलेल्या काही दिग्गज खेळाडूंच्या यादीत विराजमान झाला आहे. (IPL 2024, SRH vs RCB)

(हेही वाचा- Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? )

आयपीएलमधील वेगवान शतकं, 

ख्रिस गेल ३० चेंडू (२०१३) वि. पुणे सुपरजायंट्स

युसुफ पठाण – ३७ चेंडू (२०१०) वि. मुंबई इंडियन्स

डेव्हिड मिलर – ३८ चेंडू (२०१३)  वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

ट्रेव्हिस हेड – ३९ चेंडू (२०२४) वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

ॲडम गिलख्रिस्ट – ४२ चेंडू (२००८) वि. मुंबई इंडियन्स

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.