IPL 2024 SRH vs RR : ध्रुव जुरेलची दुखापत किती गंभीर?

IPL 2024 SRH vs RR : ध्रुव जुरेलच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे हैद्राबाद विरुद्धचा सामना त्याने अर्धवट सोडला. 

98
IPL 2024 SRH vs RR : ध्रुव जुरेलची दुखापत किती गंभीर?
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. हैद्राबाद डावाच्या नवव्या षटकांत त्याने मैदान सोडलं. यजुवेंद्र चहलचा एक चेंडू ट्रेव्हिस हेडने डीप मिडविकेटकडे टोलवला. सीमारेषेवर असलेल्या जुरेलने हा चेंडू अडवण्यासाठी सूर मारला खरा. पण, तो खाली पडला आणि उठल्यावर तो लंगडताना दिसला. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. त्यानंतर तो मैदानावर येऊ शकला नाही. (IPL 2024 SRH vs RR)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक खर्चासंदर्भात नोटीस)

राजस्थान रॉयल्स प्रशासनाने अजून जुरेलच्या (Dhruv Jurel) दुखापतीचं स्वरुप स्पष्ट केलेलं नाही. पण, त्याला ३ ते ४ सामन्यांची किमान विश्रांती लागू शकते. टी-२० विश्वचषकासाठीच्या (T20 World Cup) संघात जुरेलचा समावेश नाही. त्यामुळे आयपीएल (IPL) झाल्यानंतर जुरेलला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळही मिळेल. यंदाच्या हंगामात जुरेलने फलंदाजीत आश्वासक कामगिरी करताना संघाची गरज ओळखून कामगिरी बजावली आहे. २३ वर्षीय जुरेलने १० सामन्यांत १०२ धावा केल्या असल्या. तरी ५२ धावांची त्याची खेळी गाजली होती. (IPL 2024 SRH vs RR)

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघाचा एका धावेनं निसटता पराभव झाला. ट्रेव्हिस हेड (५८) आणि नितिश रेड्डीच्या ७६ धावांच्या जोरावर सनरायझर्स हैद्राबादने २०१ घावा केल्या. त्याला उत्तर देताना राजस्थानचा संघ २० षटकांत ७ बाद २०० धावा करू शकला. (IPL 2024 SRH vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.