IPL 2024 SRH vs RR : हैद्राबादचा एका धावेनं विजय आणि आयपीएलमधील आणखी काही विक्रम

IPL 2024 SRH vs RR : सनरायझर्स हैद्राबादने गुरुवारी राजस्थान रॉयल्सचा एका धावेनं निसटता पराभव केला. 

125
IPL 2024 SRH vs RR : हैद्राबादचा एका धावेनं विजय आणि आयपीएलमधील आणखी काही विक्रम
  • ऋजुता लुकतुके

सनरायझर्स हैद्राबाद (SRH) संघाने आतापर्यंतचा अव्वल संघ राजस्थान रॉयल्सचा थरारक सामन्यात एका धावेनं पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूंवर राजस्थानला विजयासाठी २ धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारने रोव्हमन पॉवेलला पायचीत पकडलं आणि हैद्राबादला विजय मिळवून दिला. भुवनेश्वरनेच सुरुवातीच्या षटकांत जोस बटलर आणि संजू सॅमसन यांचे बळी टिपत राजस्थानच्या डावाला खिंडार पाडलं होतं. संपूर्ण सामन्यात त्याने ४१ धावांत ३ बळी मिळवले. (IPL 2024 SRH vs RR)

सनरायझर्स हैद्राबाद (SRH) संघानेही निर्धारित २० षटकांत २०१ धावा केल्या असल्या तरी त्यांची सुरुवात धिमी होती. पण, ट्रेव्हिस हेड आणि नितिश कुमार रेड्डी यांनी ४७ चेंडूंत ९६ धावांची भागिदारी करत हैद्राबादची गाडी रुळावर आणली. हेडने ४४ चेंडूंत ५७ धावा केल्या आणि नितिशने तर ४२ चेंडूंत ७६ धावा करत सनरायझर्सला अनपेक्षितपणे दोनशेच्या पार नेलं. दोघांनी यजुवेंद्र चहलच्या ४ षटकांत तब्बल ६२ धावा वसूल केल्या. (IPL 2024 SRH vs RR)

(हेही वाचा – IPL 2024, Rohit on Captaincy : ‘सगळंच काही तुम्हाला मिळत नाही,’ असं रोहित शर्मा का म्हणतो?)

या सामन्यात प्रस्थापित झालेले आणि मोडलेले नवीन विक्रम पाहूया,
हैद्राबादच्या फलंदाजाकडून सर्वाधिक षटकार,
  • डेव्हिड वॉर्नर – ८ (वि. कोलकाता, २०१७)
  • मनोज पांडे – ८ (वि. राजस्थान, २०१०)
  • हेनरिच क्लासेन – ८ (वि. कोलकाता, २०२४)
  • ट्रेव्हिस हेड – ८ (वि. बंगळुरू, २०२४)
  • नितिश रेड्डी – ८ (वि. राजस्थान. २०२४) (IPL 2024 SRH vs RR)
हैद्राबाद संघाचे निसटते विजय,
  • १ धाव – वि. राजस्थान (२०२४)
  • २ धावा – वि. पंजाब (२०२४)
  • ३ धावा – वि. मुंबई (२०२२)
  • ४ धावा – वि. दिल्ली (२०२०)
  • ४ धावा – वि. पुणे (२०१६)
  • ४ धावा – वि. बंगळुरू (२०२१) (IPL 2024 SRH vs RR)
राजस्थानचे निसटते पराभव,
  • १ धाव – वि. दिल्ली (२०१२)
  • १ धाव – वि. राजस्थान (२०२४)
  • ४ धावा – वि. मुंबई (२०१०)
  • ४ धावा – वि. दिल्ली (२०१४)
  • ४ धावा – वि. पंजाब (२०११) (IPL 2024 SRH vs RR)
सामना हरताना सर्वोत्तम भागिदारी,
  • १३५ धावा – केन विल्यमसन व मनोज पांडे (२०१४)
  • १३४ धावा – यशस्वी जयस्वाल व रियान पराग (२०२४)
  • १२६ धावा – फाफ दू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल (२०२३) (IPL 2024 SRH vs RR)
सनरायझर्य हैद्राबादने पहिली फलंदाजी करत मिळवलेले विजय
  • ६ सामने
  • ५ विजय
  • १ पराभव (IPL 2024 SRH vs RR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.