- ऋजुता लुकतुके
मैदानावर सुपरमॅन आलाय का?
नाही. हा पक्षी आहे का?
अरे! हा तर रमणदीप आहे.
अशी प्रतिक्रिया समालोचकांची होती. लखनौ सुपरजायंट्स संघाचा सलामीवीर अर्शिन कुलकर्णीचा झेल सूर मारून रमणदीपने (Ramandeep) पकडला तेव्हा समालोचन कक्षातच नाही, तर सगळीकडे अशाच प्रतिक्रिया उमटल्या. स्टार्कचा हा गुड लेंग्थ चेंडू अर्शिन खेळू शकला नाही. बॅटची कड घेऊन तो बॅकवर्ड पॉइंटला उडाला. पण, रमणदीप तिथं सावध होता. त्याने चेंडूचा अचूक अंदाज तर घेतलाच. शिवाय योग्य वेळी सूर मारून त्याने अशा काही चपळाईने झेल पकडला की, गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जवळचा क्षेत्ररक्षक आंद्रे रसेल स्तब्ध झाले. (IPL 2024 ‘Super RaMan!’)
Judgment 💯
Technique 💯
Composure 💯Ramandeep Singh with one of the best catches you’ll see 😍👏
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #LSGvKKR | @KKRiders pic.twitter.com/VHoXgC0qGu
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2024
(हेही वाचा – Congress सत्तेवर आल्यास राम मंदिराचा निर्णय बदलणार; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा खळबळजनक दावा)
एकतर रमणदीपचा (Ramandeep) अंदाजही बरोबर ठरला आणि मागे धाव घेत त्याने मारलेला सूर अचूकता आणि चपळाईची परिसीमा होती. म्हणूनच समालोचक रवी शास्त्री म्हणाले, ‘आयपीएलच्या (IPL) इतिहासातील हा सर्वोत्तम झेल ठरावा.’ कोलकाता विरुद्ध लखनौ सामन्यात कोलकाताकडून सुनील नरेनने पुन्हा एकदा घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवून देत ३८ चेंडूंत ८१ धावा केल्या. आणि त्याच्या जोरावर कोलकाताने पहिली फलंदाजी करताना ५ बाद २३६ अशी धावसंख्या उभारली. (IPL 2024 ‘Super RaMan!’)
त्याला उत्तर देताना लखनौची गाडी सुरुवातीपासून रुळावरून घसरत गेली आणि त्यांचा अख्खा संघ १६.१ षटकांत १३७ धावा करून बाद झाला. त्यामुळे कोलकाताला ९८ धावांनी मोठा विजय मिळाला. आता कोलकाता संघ गुण तालिकेतही १६ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यांची धावगतीही १.४५३ अशी सरस आहे. (IPL 2024 ‘Super RaMan!’)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community