- ऋजुता लुकतुके
यंदाचा आयपीएलचा १७ वा हंगाम आहे. आणि यंदा २२ मार्च ते २५ मे दरम्यान ही स्पर्धा घेण्याचा बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे. फक्त यावर्षी देशात सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे त्यांनी अजून अधिकृतपणे स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की ठिकाणं आणि स्टेडिअमची जागा निश्चित करून हे वेळापत्रक जाहीर केला जाईल, असा अंदाज आहे. इतकंच नाही तर स्पर्धा पूर्णपणे भारतातच भरवण्याचा बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे. (IPL 2024)
महिला प्रिमिअर लीगचं वेळापत्रक तर बीसीसीआयने (BCCI) फ्रँचाईजी संघांनाही दाखवलं असल्याचं समजतं. आणि त्यानुसार, २२ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. अर्थात, जोपर्यंत सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होत नाहीत, तोपर्यंत आयपीएलच्या (IPL) तारखा जाहीर होण्याची शक्यता नाही. (IPL 2024)
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल करा; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी का दिला हा आदेश?)
IPL 2024 (Cricbuzz):
– Starts from 22nd March.
– The Final on 26th May. pic.twitter.com/UkE8atwMBs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 22, 2024
जर २२ मार्च ते २६ एप्रिल हे वेळापत्रक अधिकृतपणे राबवलं गेलं तर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी जेमतेम ५ दिवस मिळतील. कारण विश्वचषक स्पर्धा २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू होत आहे. भारतीय संघापुरतं बोलायचं झालं तर संघाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंडबरोबर आहे. यंदाच्या आयपीएलसाठी (IPL) बहुतेक क्रिकेट मंडळांनी खेळाडूंना पाठवण्याची तयारी दाखवली असल्याचं बीसीसीआयने (BCCI) आधीच स्पष्ट केलं आहे. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community