- ऋजुता लुकतुके
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) स्टार फलंदाज विराट कोहलीने ३०० च्या वर धावा करून ऑरेंज कॅप आपल्याकडे राखली आहे. नुकतंच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध त्याने शतकही ठोकलं. पण, या शतकानंतरही विराटवर कमी स्ट्राईक रेटमुळे टीका होतेय. ६७ धावांत त्याने ठोकलेलं शतक हे आयपीएलमधील सगळ्यात धिम्या गतीचं शतक असल्याचं बोललं जातंय. शिवाय कमी वेगामुळे बंगळुरू संघाने २० धावा कमी केल्याचा ठपकाही त्याला बसलाय. यावर अर्थातच माजी खेळाडूंची वेगवेगळी मतं आहेत. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश)
त्यातच वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज ब्रायन लारा यांनी विराटला पाठिंबा दर्शवला आहे. ‘फलंदाजाचा स्ट्राईक रेट हा तो कितव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो त्यावरून ठरतो. सलामीवीरासाठी १५० धावांचा स्ट्राईक रेट हा पुरेसा आहे. तिसऱ्या चौथ्या क्रमांकापासून धावांचा वेग वाढत जातो. आणि यंदाच्या आयपीएलमध्ये २०० धावांचा स्ट्राईकरेट हा शेवटच्या षटकांत धावा करताना झालाय,’ असं लारा यांनी मत मांडताना सांगितलं. (IPL 2024, Virat Kohli)
स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना लारा यांनी टी२० विश्वचषकातील भारतीय संघाच्या फलंदाजीचा क्रमही सांगितला. ‘मला विचाराल तर टी-२० विश्वचषकात भारतीय फलंदाजीचा क्रम रोहित, विराट आणि शुभमन असा असला पाहिजे. तीन सर्वोत्तम फलंदाज पहिल्या तीन क्रमांकावर असले पाहिजेत,’ असं लारा यांनी बोलून दाखवलं आहे. सलामीला एखाद्या तरुण खेळाडूचा विचार झाला तर हरकत नाही, असंही लारा यांना वाटतं. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- IPL 2024, Jasprit Bumrah : सातत्यपूर्ण जसप्रीत बुमराने आयपीएलमध्ये सर केला नवीन उच्चांक )
आयपीएलनंतर लगेचच विश्वचषक स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची घाई झालीय. आणि खासकरून तरुण खेळाडू धावा करण्याचं दडपण घेत असल्याचं लारा यांना वाटतं. यंदाच्या हंगामात अभिषेक शर्मा, रियान पराग आणि यशस्वी जयसवाल यांच्या कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं. (IPL 2024, Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community