- ऋजुता लुकतुके
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने चेन्नईचा २४ धावांनी पराभव करून बाद फेरी गाठली तेव्हा मैदानात उपस्थित एक चेहरा स्मित हास्य करत होता. आणि विजय साकार झाल्या झाल्या संघातील खेळाडूंच्या जल्लोषात ती व्यक्ती सामील झाली. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून बंगळुरू संघाचा एक काळचा घणाघाती फलंदाजी ख्रिस गेल (Chris Gayle) होता. बंगळुरूने सहावेळा आयपीएल बाद फेरी गाठली त्यात गेलचाच वाटा सगळ्यात मोठा असेल. आणि शनिवारी संघाने प्रतिकूल परिस्थितीत बाद फेरी गाठल्यावर गेलला नक्कीच आनंद झालेला दिसला. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदार वैतागले, मतदान केंद्रांवर गोंधळ)
ड्रेसिंग रुममध्ये त्याने खेळाडूंना मिठी मारली. ख्रिस गेलला (Chris Gayle) बंगळुरू ड्रेसिंग रुममध्ये ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणायचे. या बॉसने विराट कोहलीचं खास शब्दांत कौतुक केलं. त्याच्याबरोबरचा एक फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (IPL 2024, Virat Kohli)
Chris Gayle and Virat Kohli in the RCB dressing room together – nostalgia max! 🥹
Virat jokingly asks Chris to come back to the #IPL – what do you think about it, 12th Man Army? 😉#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/Bj9HVFfVka
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 20, 2024
‘तुला दीर्घायुष्य लाभो. प्रेम आणि आदर याच भावना याक्षणी मनात आहेत,’ असं गेलने कौतुकाने लिहिलं आहे. बंगळुरू संघासाठी ख्रिस गेलने अनेक फलंदाजीचे विक्रम केले आहेत. २०१३ मध्ये याच मैदानात त्याने पुणे वॉरिअर्सविरुद्ध ६६ चेंडूंत १७५ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा हा विक्रम आजही अबाधित आहे. (IPL 2024, Virat Kohli)
(हेही वाचा- Badminton News : सात्त्विकसाईराज व चिरागने जिंकली थायलंड ओपन स्पर्धा)
तर याच खेळी दरम्यान त्याने १३ चौकार आणि १७ षटकार ठोकले होते. सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही अजूनही त्याच्याच नावावर आहे. गेलच्या या खेळीमुळेच बंगळुरूने पुण्याविरुद्ध ३ बाद २६४ ही विशाल धावसंख्या उभारली होती. तो विक्रम यंदाच्या हंगामात मोडला. (IPL 2024, Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community