IPL 2024, Virat Kohli : विराट कोहली फिरकीला खेळताना खरंच अडखळतोय का?

विराट कोहलीने हंगामात ५०० धावा केल्या असल्या तरी त्याच्या स्ट्राईकरेटवर टीका होतेय

171
IPL 2024 RCB in Playoff : तळातून थेट बाद फेरीत पोहोचलेल्या बंगळुरू संघाविषयी खुद्द विराट कोहली काय म्हणतो?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा टी२० विश्वचषकासाठीचा संघ जाहीर झाला आहे. आणि त्यात विराट कोहलीचा (Virat Kohli) आघाडीच्या फळीत समावेश झाला आहे. पण, आयपीएलमध्ये (IPL 2024) मात्र त्याच्या स्ट्राईक रेटवरून जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय टी-२० क्रिकेट खेळायचा त्याचा दृष्टिकोणही काही माजी खेळाडूंना खटकतोय. तो पॉवर प्लेनंतर अचानक धिमा खेळतो असा सूर उमटतो आहे.

खरंतर या हंगामातील तो आघाडीचा फलंदाज आहे. ११ सामन्यांत आतापर्यंत त्याने ५०० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी आहे ७१ धावांची. आणि स्ट्राईक रेट आहे १४७ धावांचा. पण, त्याचबरोबर आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासातील सगळ्यात धीमं शतक ठोकण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर लागलाय. लीगच्या इतिहासातील तो सगळ्यात यशस्वी फलंदाज आहे. त्याच्या नावावर ७,७६३ धावा आहेत. आणि तिथेही त्याचा स्ट्राईक रेट आहे १३१ धावांचा. कोहली विषयीची आणखी एक आकडेवारी म्हणजे त्याची टी-२० विश्वचषकातील कामगिरी. तिथेही तो अव्वल असून त्याने सगळ्यात जास्त १,१४१ धावा केल्या आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Day 2024 : पासष्टावा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना)

इतकी चांगली आकडेवारी असतानाही त्याचा सध्याचा फॉर्म, स्ट्राईकरेट आणि टी-२० क्रिकेट खेळण्याची शैली यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याचा पारंपरिक आणि एक बाजू लावून धरण्याचा दृष्टिकोण सध्याच्या टी-२० प्रकाराला साजेसा नसल्याची टीका काहींनी सुरू केली आहे. याउलट इतरांना तो भरवशाचा, दडपणाखाली चांगली कामगिरी करणारा आणि आवश्यक तेव्हा आक्रमकता दाखवू शकणारा फलंदाज वाटतो.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूंची आयपीएल कामगिरी कशी आहे?)

यंदाच्या आयपीएलमधील त्याची कामगिरी समजून घेऊया.

पहिल्या १ ते ६ या षटकांमध्ये पॉवर प्ले असताना कोहलीचा स्ट्राईकरेट १५४.५३ इतका आहे. आणि हा त्याचा पॉवरप्लेमधील सर्वोत्तम स्ट्राईकरेट आहे. शेवटच्या चार षटकातील त्याचा स्ट्राईकरेट हा १६८ इतका आहे. २०२४ च्या हंगामात कोहलीचा स्ट्राईकरेट १५८ इतका आहे. पण, फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राईकरेट आहे १३४ धावांचा. आणि यावरच जाणकारांनी बोट दाखवलं आहे. फिरकीपटूंना खेळण्यात तो कमी पडतोय का, असा सवाल विचारला जातोय.

७ ते १६ या मधल्या षटकांमध्ये कोहलीचा स्ट्राईकरेट हा १३७ धावांचा आहे. आणि विशेष म्हणजे तो आतापर्यंतचा त्याचा सर्वोत्तम स्ट्राईकरेट आहे. या मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंविरुद्ध त्याने १३८ धावांचा स्ट्राईकरेट राखला आहे. थोडक्यात, विराट कोहली यापूर्वी जसा खेळत होता, तसाच या हंगामातही खेळतो आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.